शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
3
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
4
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
5
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
6
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
7
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
8
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
9
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
10
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
11
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
13
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
14
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
15
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
16
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
17
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
18
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
19
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
20
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस

नाशिक जिल्ह्यातून ८४.१६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण ; विभागात मुलींचीच बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 19:38 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.२८) जाहीर करण्यात आला असून, नाशिक विभागातून यावर्षीही बारावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. फेब्रुवारी/मार्च २०१९ मध्ये नाशिक विभागातून ९२ हजार ०६४ मुले, तर ६७ हजार ८३३ मुली असे एकूण १ लाख ५९ हजार ८९७ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी ८१.५१ टक्के मुले, ८९.१९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून, मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णत्तेचे प्रमाण ७.६८ टक्क्यांनी अधिक असल्याने बारावीच्या निकालात यावर्षीही मुलींनीच बाजी मारली आहे.

ठळक मुद्देनाशिक विभागातून बारावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी ८१.५१ टक्के मुले, ८९.१९ टक्के मुली उत्तीर्ण

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.२८) जाहीर करण्यात आला असून, नाशिक विभागातून यावर्षीही बारावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. फेब्रुवारी/मार्च २०१९ मध्ये नाशिक विभागातून ९२ हजार ०६४ मुले, तर ६७ हजार ८३३ मुली असे एकूण १ लाख ५९ हजार ८९७ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी ८१.५१ टक्के मुले, ८९.१९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून, मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णत्तेचे प्रमाण ७.६८ टक्क्यांनी अधिक असल्याने बारावीच्या निकालात यावर्षीही मुलींनीच बाजी मारली आहे. विभागातील नाशिक जिल्ह्यातील ९० परीक्षा केंद्रांच्या माध्यमातून ४१७ महाविद्यालयातील ७९ हजार ८५४ विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ८४.१६ टक्के म्हणजे ५९ हजार ६२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर धुळे जिल्ह्याचा निकाल ८३.५२ टक्के लागला आहे. येथे ४४ केंद्रांत २४ हजार १९३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी २० हजार २०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जळगावमधून सर्वाधिक ८६.६१ टक्के निकाल लागला आहे. येथील ७१ परीक्षा केंद्रांवरून ४८ हजार ६१८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ४२ हजार १०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर नंदुरबारच्या २३ केंद्रांवर १६ हजार २४१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यापैकी १३ हजार ६१४ म्हणजे ८३.८२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.निकालासह कॉपीमध्येही जळगाव प्रथम नाशिक विभागातून बारावीच्या परीक्षेत जळगावचे सर्वाधिक ८६.६१ टक्के विद्यार्थी  उत्तीर्ण झाले आहेत. मात्र परीक्षेदरम्यान सर्वाधिक १२६ कॉपी केसेस जळगावमध्येच झाल्या आहेत. त्यामुळे जळगाव उत्तीर्णतेच्या निकालासोबतच कॉपीप्रकरणामध्येही प्रथम असल्याचे दिसून आले आहे. बारावीच्या परीक्षेत नाशिक जिल्ह्यात १३, धुळे १० तर नंदुरबारमध्ये केवळ ५ कॉपी प्रकरणे आढळली होती. त्या तुलनेत जळगावमधील गैरमार्गाची प्रकरणे नाशिक विभागीय मंडळाला आत्मचिंतन करायला लावणारी आहेत. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकResult Dayपरिणाम दिवसStudentविद्यार्थीSchoolशाळाHSC Exam Resultबारावी निकाल