शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
3
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
4
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
5
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
6
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
7
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
8
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
10
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
11
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
12
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
13
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
14
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
15
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
16
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
17
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
18
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
19
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
20
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

शहरात ८0९ मुले शाळाबाह्य

By admin | Updated: September 6, 2016 22:58 IST

मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची गरज : अभिषेक कृष्ण

 सिडको : महाराष्ट्र हा प्रगतशीर राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे आपण बोलत असलो तरी आजही महाराष्ट्रात रस्ते, वीज, पाणी यापलीकडे बोलले जात नाही. परंतु समाजाचे घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व समाज घडवू शकतात अशांकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याने स्वातंत्र्य मिळूनही उपयोग काय? असा प्रश्न उपस्थित करीत, शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी केले. शहरात सुमारे ८00 मुले शाळाबाह्य असल्याचेही ते यावेळी म्हणाले.खुटवडनगर येथील इस्पॅलियर स्कूलमध्ये आज शाळाबाह्य मुलांच्या अहवाल सादर करण्यात आला याप्रसंगी आयुक्त कृष्ण बोलत होते. आजही शाळाबाह्य मुलांची व बाल कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, आरोग्याचीदेखील व्यवस्थित सुविधा नाही. शाळाबाह्य मुले ही समाजाचे घटक असून, त्यांची जर काळजी घेतली नसल्याने ही चिंतेची बाब असल्याचेही कृष्ण यांनी सांगितले. रस्ते, नाले, गटारी यावर कोट्यवधी रुपये शासन खर्च करीत असले तरी भविष्यातील नागरिक चांगले घडविण्यासाठी शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे गरजेचे आहे. शहरातील खासगी शाळांमध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणात मुलांना शिक्षण देत असून, मनपा शाळेतील शिक्षकांनी मुलांना शिकविण्यासाठी एक चौकट आखून घेतली असून, त्या चौकटीच्या बाहेर शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत नसल्याने ही चिंतेची बाब आहे. यापुढील काळात मनपाच्या शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन मनपाने विद्यार्थ्यांना अधिकाधिक चांगले शिक्षण देणे ही जबाबदारीच असल्याचेही आयुक्त कृष्ण यांनी सांगितले. यावेळी शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी नितीन उपासनी, मनपा शिक्षण मंडळ सभापती संजय चव्हाण, नगरसेवक तानाजी जायभावे, भीष्मराज बाम आदिंनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शाळेचे संचालक सचिन जोशी यांनी, तर सूत्रसंचालन योगीता गोखले यांनी केले. यावेळी अपर्णा घटे, संदीप शिंदे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)