शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

शहरात ८० मिलिमीटर पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2016 23:49 IST

आशा पल्लवित : रविवारी सर्वाधिक पावसाची नोंद

 नाशिक : यावर्षी शहरात आतापर्यंत ८० मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद पेठरोडवरील हवामान खात्याने केली आहे. रविवारी शहरात पंधरा तासांमध्ये ४९.१ मिलिमीटर इतका या मोसमातील सर्वाधिक पाऊस नोंदविला गेला.शनिवारी मध्यरात्रीपासून पावसाला शहरासह जिल्ह्यात सुरुवात झाली. मध्यरात्रीनंतर पहाटे पावसाने विश्रांती घेतली; मात्र सकाळी पुन्हा जोर धरला आणि रात्रीपर्यंत पाऊस शहरासह उपनगरांमध्ये तसेच जिल्ह्यात टिकून होता. त्यामुळे रात्री साडेआठ वाजेपर्यंत शहरात आजपर्यंतची सर्वाधिक ४९.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जूनअखेर शहरात ११.३ मि.मी पावसाची नोंद के ली गेली, तर जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी शहरात १.२ मि.मी पाऊस झाला होता. रविवारी संध्याकाळनंतर पावसाचा जोर कमी झाला. साडेपाच ते साडेआठ वाजेपर्यंत ६.४ मि.मी इतका पाऊस पडल्याचे हवामान खात्याने सांगितले. जूनमध्ये पावसाने नाशिककरांची निराशा जरी केली असली तरी जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने दमदार ‘एन्ट्री’ केल्याने या महिन्यात नाशिककरांना मनमुरादपणे पावसाचा आनंद लुटता येण्याची शक्यता आहे. वरुणराजाची कृपादृष्टी अशीच राहिल्यास गोदावरी दुथडी भरून वाहण्यास वेळ लागणार नाही, अशी चर्चा दिवसभर शहरातील विविध चहाच्या टपऱ्या तसेच रिमझिम पाऊसधारा अंगावर झेलत पाववडा, समोसा खात नागरिकांकडून केली जात होती. जुलै महिन्याच्या तिसऱ्या दिवशी झालेल्या या संततधार पावसाने नाशिककरांच्या आशा अधिक पल्लवित झाल्या आहेत.शहरासह जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात व्हावी, यासाठी नागरिकांनी आपापल्या परीने परमेश्वराला वेगवेगळ्या उपासना पद्धतींमधून साकडे घातले होते. गोदाकाठावरील बाणेश्वर महादेव मंदिरातील पिंडही पाण्यात बुडविण्यात आली होती. एकूणच सर्वच नाशिककर मनापासून पर्जन्यवृष्टीसाठी प्रार्थना करत होते. (प्रतिनिधी)