शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

७९ अल्पवयीन मुली पळून गेल्या, पोलिसांना सापडल्या केवळ ५२ मुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:15 IST

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून आजपर्यंत या दीड वर्षात नाशिक शहर व परिसरातून तब्बल २४२ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होत्या. शहरातील ...

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून आजपर्यंत या दीड वर्षात नाशिक शहर व परिसरातून तब्बल २४२ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होत्या. शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्या पालकांकडून याप्रकरणी तक्रारी दाखल केल्या गेल्या. एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली पोलिसांची ड्यूटी, तर दुसरीकडे बेपत्ता मुलींचा शोधदेखील ‘खाकी’कडून घेतला जात होता. आतापर्यंत २०० मुलींना शोधून त्यांच्या पालकांच्या हवाली करण्यात पोलिसांना यश आले आहे. चालूवर्षीही मुली बेपत्ता होण्याच्या घटना घडतच आहेत. आतापर्यंत ७९ मुली बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांकडे झाली आहे. त्यापैकी पोलिसांनी ५२ मुलींना शोधून पालकांच्या स्वाधीन केले आहे, तर उर्वरित २७ मुलींचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

---आलेख---

अल्पवयीन मुली पळून गेल्याच्या घटना

वर्ष - बेपत्ता मुली- मिळून आलेल्या मुली

२०१८- १८२- -- १७२

२०१९- १९९- --- १९३

२०२०- १६३- --- १४८

२०२१ (मेअखेर) --- ०७९

-----मुली चुकतात कुठे ---

उदाहरण-१

अनेकदा अल्पवयीन मुलींना प्रेम आणि शारीरिक आकर्षण यांच्यामधील फरक लक्षात येत नाही. शहरातील एका चांगल्या वसाहतीमधील अशाचप्रकारे प्रेमवीराच्या आमिषाला भुलून अल्पवयीन मुलीने घर सोडले आणि त्याने दिलेल्या लग्नाच्या आमिषाला बळी पडल्याचे समोर आले. पोलिसांनी तिला अहमदनगर जिल्ह्यातील एका धार्मिक स्थळाहून ताब्यात घेतले.

--

उदाहरण-२

अल्पवयीन मुली घरातून निघाल्यानंतर सर्वप्रथम त्यांचा मोबाइल सोबत असलेल्या प्रियकराच्या सांगण्यावरून बंद करून टाकतात. असे पोलिसांच्या तपासातून वारंवार पुढे आले आहे. शहरातील एका मुलीनेही असेच केले. तिने आपले घर सोडले आणि प्रियकरासोबत थेट गोवा अन‌् पुढे नेपाळ गाठले. मुलीचा मोबाइल बंद येत असल्याने शोधकार्यात अडचणी निर्माण हाेत होत्या; मात्र महिला पोलीस अंमलदाराने प्रियकराच्या मोबाइल क्रमांकावर सातत्याने लक्ष ठेवत तांत्रिक विश्लेषणाच्या साहाय्याने त्यांचे ‘लोकेशन’ शोधून काढले. त्यांना विश्वासात घेत समजूत काढून दोघांना भारतात अर्थात नाशकात सुरक्षित आणले.

---

उदाहरण-३

शहरातील एका झोपडपट्टी भागातील मुलगी अशाच एका तरुणाच्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली आणि तिने घरातून काढता पाय घेतला, तरुणासोबत दुसऱ्या शहरात राहू लागली. तरुणाने पांडवलेणी भागातील एका मंदिरात तिच्यासोबत बनावट लग्न केले आणि कालांतराने तिला पुन्हा तिच्या घरी सोडून दिले. हा सगळा प्रकार ती गर्भवती झाल्यानंतर उघडकीस आला. पोलिसांनी त्या संशयित तरुणावर कारवाईसुद्धा केली.

---इन्फो---

मुलामुलीचे चुकीचे पाऊल पडू नये म्हणून व्हा त्यांचे मित्र

मुलींचा वयोगट जर लक्षात घेतला तर पौगंडावस्थेतील आहे, हे समजून घ्यायला हवे. या वयात मानसशास्त्रातूनदेखील हे सिद्ध झाले आहे की, मन आणि शरीरात वेगाने बदल होत असतात म्हणूनच सोळावं वर्ष धोक्याचं असं म्हटलं जातं, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मृणाल भारद्वाज यांनी सांगितले.

घरात मैत्रीपूर्ण वातावरण नसते. मैत्री आणि प्रेम यांच्यात त्यांची गल्लत होते आणि अनोळखी व्यक्तीसुद्धा ओळखीची व आपलीशी वाटू लागते. समवयस्क मुला-मुलीचा प्रभाव या वयात अधिक होत असतो.

अनेकदा आर्थिक स्तर जर कमकुवत असला तरीदेखील अल्पवयीन मुली मौजमजा, चंगळवादाच्या आमिषाला भुलूनसुद्धा घरातून पळून जाण्याचे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे आई, वडिलांपैकी कोणीतरी मुलामुलींचा मित्र म्हणून भूमिका बजवायला हवी, असा सल्लाही भारद्वाज यांनी दिला.

270721\27nsk_25_27072021_13.jpg~270721\27nsk_26_27072021_13.jpg~270721\27nsk_27_27072021_13.jpg

अल्पवयीन मुली पळून जातात~अल्पवयीन मुली पळून जातात~अल्पवयीन मुली पळून जातात