शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

७० कोटी घरपट्टी वसुली

By admin | Updated: February 24, 2016 00:04 IST

महापालिका : आणखी २० कोटींचे उद्दिष्ट

 नाशिक : मार्चअखेर महापालिकेने घरपट्टी वसुलीतून १२५ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले असले तरी महिनाभरात ९० कोटी रुपयांचा आकडा पार करण्याचा दावा घरपट्टी विभागाचे उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी केला आहे. दरम्यान, थकबाकीदार मिळकतधारकांविरुद्ध सुरू असलेली वसुली मोहीम आणखी व्यापक करण्यात येणार असल्याचे दोरकुळकर यांनी सांगितले. महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी मागील वर्षी आपले पहिले अंदाजपत्रक सादर करताना घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट १२५ कोटी रुपयांचे ठेवले होते. त्यासाठी अंदाजपत्रकात घरपट्टीत वाढ करण्याची शिफारस करण्यात आली होती, तर नव्याने होणाऱ्या वसाहतीत रेडीरेकनरनुसार घरपट्टी आकारणीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र, स्थायी समिती व महासभेने घरपट्टी वाढीचा प्रस्ताव फेटाळून लावला होता. त्यामुळे आयुक्तांनी घरपट्टीचे उत्पन्नवाढीसाठी मागील वर्षी एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत घरपट्टी भरणाऱ्या मिळकतधारकांना २ ते ५ टक्क्यांपर्यंत सवलत योजना लागू केली होती. या योजनेला मिळकतधारकांनी चांगला प्रतिसाद दिल्याने पहिल्या तीन महिन्यांतच घरपट्टीची वसुली सुमारे ३६ कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचली होती. नंतर मात्र घरपट्टी वसुलीचा वेग मंदावला होता. आता २३ फेबु्रवारी अखेर महापालिकेने ७० कोटी रुपये घरपट्टीची वसुली केली असून, त्यात सातपूर विभाग- ७ कोटी ७५ लाख, पश्चिम- १२ कोटी ९४ लाख, पूर्व- १२ कोटी ६८ लाख, पंचवटी- १० कोटी ९२ लाख, सिडको- १३ कोटी ६४ लाख आणि नाशिकरोड १२ कोटी १० लाख रुपये वसुली करण्यात यश आले आहे. मार्चअखेरपर्यंत ९० कोटींच्या वर वसुली जाईल, असा विश्वास रोहिदास दोरकुळकर यांनी व्यक्त केला आहे.