शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

६६ नगरसेवकांचा पहिल्यांदाच प्रवेश

By admin | Updated: February 26, 2017 00:13 IST

तरुणांना संधी : ३८ विद्यमान, तर १८ माजी नगरसेवक

नाशिक : महापालिका निवडणुकीत यंदा १२२ पैकी निवडून आलेले ६६ नगरसेवक पहिल्यांदाच महापालिकेच्या सभागृहात पाऊल ठेवणार आहेत. त्यात बव्हंशी तरुणांना संधी लाभली असून, ३८ विद्यमान नगरसेवक पुन्हा एकदा निवडून आले आहेत. १८ माजी नगरसेवकही महापालिकेत परतले आहेत.  महापालिका निवडणुकीत १२२ जागांसाठी ८२१ उमेदवार रिंगणात होते. निवडणुकीत तब्बल २२ राजकीय पक्ष सहभागी झाले होते. त्यामध्ये प्रमुख राजकीय पक्षांनी तरुण चेहऱ्यांना संधी दिली होती. बहुसदस्यीय प्रभाग रचनेमुळे एका प्रभागातून चार सदस्य निवडून द्यायचे होते. त्यानुसार, राजकीय पक्षांकडून चार जागांवर उमेदवार देताना जुन्या-नव्यांचाही मेळ घालण्यात आला. त्यामुळे एकामुळे अन्य तिघांनाही फायदा झाला. यंदा १२२ पैकी तब्बल पन्नास टक्क्यांहून अधिक म्हणजे ६६ नगरसेवक पहिल्यांदाच महापालिकेच्या सभागृहात प्रवेश करत आहेत. त्यातही तरुण पिढीची सर्वांत जास्त संख्या आहे. अनेक तरुण चेहरे उच्चशिक्षित असल्याने महापालिकेच्या कामकाजात त्यांच्या शिक्षणाचा लाभ होईल. पहिल्यांदाच पाऊल ठेवणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने, भाजपाचे विद्यमान आमदार व शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांचे सुपुत्र मच्छिंद्र सानप, आमदार सीमा हिरे यांचे दीर योगेश हिरे, भाजपा आमदार राहुल अहेर यांच्या चुलत भगिनी हिमगौरी आडके, कॉँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक उत्तमराव कांबळे यांचे सुपुत्र समीर कांबळे, माजी आमदार वसंत गिते यांचे सुपुत्र प्रथमेश गिते, माजी महापौर अशोक दिवे यांचे सुपुत्र प्रशांत दिवे, माजी सनदी अधिकारी चंद्रकांत खाडे आदिंचा समावेश आहे. निवडणुकीत ३८ विद्यमान नगरसेवकांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. त्यात काही नगरसेवक पाचव्यांदा, तर काही चौथ्यांदा महापालिकेत प्रवेश करत आहेत. यंदा १८ माजी नगरसेवकांचे पुन्हा एकदा नशीब खुलले आहे. त्यात काही नगरसेवकांनी यापूर्वी महापालिकेत हॅट््ट्रिक साधलेली आहे. (प्रतिनिधी)