शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

आमदाराकडून साठ लाख मागितल्याप्रकरणी गुन्हा

By admin | Updated: March 11, 2017 02:09 IST

नाशिक : आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या अ‍ॅड. बाळासाहेब चौधरी यांनी आपल्याकडे याचिका मागे घेण्यासाठी साठ लाख रुपयांची मागणी केल्याची तक्रार हिरे यांनी केली आहे.

नाशिक : महापालिकेची अभ्यासिका नाममात्र दराने दिल्याच्या विषयावर आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या अ‍ॅड. बाळासाहेब चौधरी ऊर्फ गोपाळ आडगावकर यांनी आपल्याकडे याचिका मागे घेण्यासाठी पन्नास ते साठ लाख रुपयांची मागणी केल्याची तक्रार हिरे यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात केली आहे.महापालिकेच्या मिळकती राजकीय नेत्यांना आणि नगरसेवकांना नाममात्र दरात दिल्याच्या प्रकरणावरून बाळासाहेब चौधरी यांनी जनहित याचिका दाखल केली होती. त्यावेळी नगरसेवक असलेल्या सीमा हिरे यांच्या समर्थ महिला मंडळाला आकाशवाणी केंद्राजवळील अभ्यासिका महापालिकेने चालविण्यासाठी दिली होती. त्या अनुषंघाने ही याचिका दाखल करण्यात आली होती. अ‍ॅड. चौधरी यांनी या खटल्यात आपण निवृत्त आयकर अधिकारी नवी दिल्ली तसेच पेशाने वकील असल्याचे प्रतिज्ञापत्रकावर नमूद केले होते. सदरची याचिका अद्यापही न्यायप्रविष्ट आहे. याचदरम्यान एकाच्या मध्यस्थीने चौधरी यांनी आपल्याकडे जनहित याचिका मागे घेण्यासाठी पन्नास ते साठ लाख रुपयांची मागणी केली, असे सीमा हिरे यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे. दरम्यान, आता आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार बाळासाहेब चौधरी यांचे खरे नाव गोपाळ अनंत अडावदकर असून, त्यांनी वकील असल्याचे सांगून अनेक गरजू आशिलांना फसविले आहे, असेही तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार गंगापूर पोलिसांनी बाळासाहेब अनंत चौधरी ऊर्फ गोपाळ अडावदकर (रा, मंदार सोसायटी, गोळे कॉलनी) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)