शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

४१ घरमालकांवर गुन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:56 IST

सातपूर: भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या घरमालकांवर स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येत असून, सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील ४१ घरमालकांवर आतापर्यंत गुन्हे दाखल करण्यात आल्याने घरमालकांमध्ये धावपळ उडाली आहे. पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी घरमालकांनी भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यात द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे सातपूर : भाडेकरूंची माहिती दिली नाहीे

सातपूर: भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या घरमालकांवर स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येत असून, सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील ४१ घरमालकांवर आतापर्यंत गुन्हे दाखल करण्यात आल्याने घरमालकांमध्ये धावपळ उडाली आहे. पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी घरमालकांनी भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यात द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.घर भाड्याने दिल्यानंतर सदर भाडेकरूची संपूर्ण माहिती नजीकच्या पोलीस स्टेशनला तातडीने देणे आवश्यक आहे. पोलिसांकडून याबाबतचे निवेदन वारंवार जाहीर करण्यात आले आहे. मात्र अजूनही बहुतांश लोकांना अशा प्रकारची माहिती पोलिसांना द्यायची असते, याची माहितीच नाही. लोकांमध्ये याबाबत जागृती होणे आवश्यक आहे. पोलिसांच्या भीतीपोटी अनेकजण पोलिसांपासून चार हात दूर राहणेच पसंत करतात. त्यामुळे पोलीस स्टेशनला माहिती देण्यासाठी जाणेही अनेकजण टाळतात.शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन शहरात भाड्याने राहात असलेल्या देशी, परदेशी लोकांची माहिती पोलिसांकडे उपलब्ध असावी,म्हणून भाडेकरूंची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. भाडेकरूंची माहिती भरून देण्यासाठी लागणारा अर्ज स्थानिक पोलीस ठाण्यात उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात लोकांकडून हे अर्ज घेण्यासाठी एका पोलीस कर्मचाºयाची नियुक्ती करण्यात आली आहे. कायद्यानुसार घरमालकाने घर भाड्याने देताना संबंधित भाडेकरूची सविस्तर माहिती पोलीस ठाण्यास देणे बंधनकारक आहे. घरमालकांनी संबंधित भाडेकरूची माहिती रजिस्टर पोस्टाने, कुरिअरने अथवा स्वत: अथवा विश्वासू व्यक्तीमार्फत पोलीस ठाण्यात सादर करावी. भाडेकरूला घर दिल्यानंतर घरात किंवा त्याच्याकडून शहरात गुन्हा घडल्यास पोलिसांना त्याचा तपास करण्यासाठी या माहितीचा उपयोग होतो. भाडेकरूंची तातडीने माहिती न देणाºया घरमालकांविरुद्ध भादंवि कलम १८८ प्रमाणे कारवाई करण्यात येते. दरम्यान, नाशिक पोलीस आयुक्तालयातील एकट्या सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील ४१ घरमालकांवर आतापर्यंत भादंवि कलम १८८ प्रमाणे कारवाई करण्यात आली असल्याची माहिती विवेक किशोर भदाणे यांनी दिली आहे. यापुढेही कारवाई सुरूच राहणार असून घरमालकांनी भाडेकरूंची माहिती सादर करावी, असे आवाहन भदाणे यांनी केले आहे.