शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

३८ ट्रॅप कॅमेरे अन् २० पिंजरे मात्र रिपरिपीमुळे प्रयोगांवर पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 17:38 IST

संध्याकाळनंतर रहिवाशांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, वनविभागाच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करत बिबट्यांच्या हल्ल्यांत होणारी मनुष्यहानी रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे,

ठळक मुद्देबिबट्याचा संचार कायमपावसामुळे अडचणींत वाढ गावकऱ्यांनी खबरदारी घ्यावी

नाशिक : दारणा नदीच्या काठालगत असलेल्या सामनगाव, एकलहरे परिसरात बिबट्याचा संचार अद्यापही कायम आहे. या भागात एक दोन नव्हे तर तब्बल २० पिंजऱ्यांची तटबंदी करण्यात आली आहे. बिबट्या रात्रीच्यावेळी भटकंती करतो अन् पिंजºयांभोवती फेरफटकाही मारतो; मात्र पिंज-यात येत नसल्याने वनविभागापुढे सध्या प्रतीक्षा व प्रयोगांमध्ये अदलाबदल करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लढविल्या जाणा-या क्लृप्त्याही पावसाच्या रिपरिपीमुळे अयशस्वी ठरू लागल्या आहेत.

दारणाकाठालगत बिबट्याच्या हल्ल्यात चार बळी गेले आहेत. यामध्ये तीन चिमुकल्यांचा समावेश आहे. तसेच चौघा चिमुकल्यांचे प्राण सुदैवाने बिबट्याच्या हल्ल्यात बचावला आहे. दारणाकाठालगतच्या विविध गावांमध्ये ऊसशेतीलगत सुमारे ३८ ट्रॅप कॅमेरे व २० पिंजरे तैनात करण्यात आले आहेत. तरीदेखील बिबट्या अद्याप जेरबंद होऊ शकलेला नाही.दारणा खोºयालगत बाभळेश्वर, हिंगणवेढे, दोनवाडे या गावांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेले आहेत. तसेच चेहडी, पळसे, सामनगाव, कोटमगाव या गावांत दैव बलवत्तर राहिल्यामुळे मुलांचे प्राण वाचले. या गावांमध्ये सातत्याने बिबट्याचे दर्शन अन् हल्ले झाल्याने रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली.
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी युध्दपातळीवर मोहीम वनविभागाने हाती घेतली आहे. दरम्यान, दारणा खो-यालगत गावांमध्ये संध्याकाळनंतर रहिवाशांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, वनविभागाच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करत बिबट्यांच्या हल्ल्यांत होणारी मनुष्यहानी रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकwildlifeवन्यजीवforest departmentवनविभागRainपाऊस