शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

३३० क र्मचारी सहभागी : ग्रामीण डाकसेवकांचा बेमुदत संप

By admin | Updated: March 11, 2015 00:15 IST

जिल्ह्याची टपाल सेवा ठप्प

नाशिक : आॅल इंडिया ग्रामीण डाकसेवक युनियनने संपूर्ण देशातील ग्रामीण डाकसेवकांना आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप करण्याचे आवाहन केल्याने नाशिक जिल्ह्यातील विभागीय शाखेने संप पुकारला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण टपाल शाखा कार्यालयांमधील तब्बल ३३० डाकसेवक बेमुदत संपावर गेल्याने नाशिकच्या विविध तालुक्यांमधील टपालसेवा ठप्प झाली आहे. नाशिक टपाल विभागांतर्गत ग्रामीण भागातील २३५ टपाल कार्यालयांचा बटवडा आजपासून ठप्प झाल्याने ग्रामीण जनतेला पोस्टमनची प्रतीक्षा करावी लागणार आहे. ग्रामीण डाकसेवक युनियनच्या नाशिक विभागीय शाखेनेदेखील बेमुदत संपामध्ये सहभाग नोंदविला आहे. डाकसेवक संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी देशव्यापी संप पुकारला आहे.स्थानिक विभागीय शाखेचे अध्यक्ष आर. एस. जाधव, सचिव सुनील जगताप यांच्या नेतृत्वाखाली मुख्य टपाल कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करत ग्रामीण डाकसेवकांनी ‘आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्च्या खाली करा..’, ‘कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’ अशा घोषणांनी सरकार व टपाल विभागविरोधी सूर आळवला. यावेळी सुमारे पन्नास ते शंभर ग्रामीण डाकसेवकांनी विविध मागण्या व घोषवाक्यांचे फलक हातात घेऊन प्रशासनाचा निषेध नोंदविला. टपाल प्रशासनाकडून मात्र केवळ निम्म्याहुन अधिक ग्राम सेवक कर्मचारी संपात सहभागी झाले नसल्याचे सांगण्यात आले. केवळ एका संघटनेशी संबंधित असलेल्या कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग नोंदविल्याची माहिती मुख्य टपाल कार्यालयाच्या सुत्रांनी दिली आहे. ग्रामीण भागातील टपाल व्यवस्थेचे कामकाज सुरळीत चालावे, म्हणून रोजंदारीवर त्या ठिकाणी कर्मचारी तात्पुरत्या स्वरूपात घेण्याच्या सुचना प्रवर अधीक्षक नाना वानखेडे यांनी पोस्टमास्तरांना दिल्या आहेत. (प्रतिनिधी)