शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

घोटीच्या शनैश्चर पतसंस्थेत ३३ लाखांचा अपहार

By admin | Updated: July 4, 2016 22:49 IST

संशयित फरार : व्यवस्थापकाविरूध्द गुन्हा दाखल

घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील शनेश्चर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत बनावट सोने तारण कर्ज प्रकरण तयार करून ३३ लाख रुपयांचा अपहार संस्थेचे व्यवस्थापक संतोष शिंदे यांनी केल्याचा ठपका संस्थेने ठेवला आहे. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात संबधित व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घोटी येथील शनेश्चर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत अफरातफर झाल्याची तक्रार येताच इगतपुरीच्या सहाय्यक निबंधकानी गतवर्षी संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक केली होती. संस्थेचे प्राधिकृत अधिकारी तथा उपलेखापाल परीक्षक संजीव शिंदे यांनी आज घोटी पोलीस ठाण्यात व्यवस्थापकाविरु द्ध फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले आहे की, संतोष शंकर शिंदे, रा. घोटी हे १९९७ पासून ते १८ फेबु्रवारी २०१६ या कालावधीत संस्थेत व्यवस्थापक म्हणून काम करत होता. त्याने संचालक, ठेवीदार, सभासद, कर्जदार यांना संपूर्णपणे अंधारात ठेवत आपल्या पदाचा गैरवापर करत, आपल्या स्वत:च्या फायद्याकरिता बनावट तेवीस कर्जदारांच्या नावे कर्ज तयार करून त्याच्या नावे खाते उघडून बनावट सोने तारण कर्ज प्रकरण तयार करत, सोने मूल्यांकनापेक्षा जादा रक्कमेचे कर्ज देऊन, रोखीने रक्कम नावे टाकून सोने तारण कर्जाचा मुद्दल ३२ लाख ७९ हजार रुपये तसेच मूल्याकनापेक्षा जादा रकमेचे कर्ज यातील मुद्दल २५ हजार ८३७ रुपये असा एकूण ३३ लाख चार हजार ८३७ रु पये रक्कमेचा अपहार केला.घोटी पोलिसांनी प्राधिकृत अधिकारी संजीव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून व्यवस्थापक संतोष शंकर शिंदे यांच्याविरुद्ध भादंवि कलम प्रमाणे घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कर्जदारांच्या नावे टाकलेली रक्कम मंजुरीपेक्षा जादा टाकत असल्याची बाब उघड झाल्याने व सोने तारण कर्जदार व्यक्तीची नावे बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर अफरातफरीचा तपास विभागीय पोलीस अधिकारी घोगरे, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कमलेश बच्छाव या प्रकरणाचा तपास करीत आहे.(वार्ताहर)