शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

विभागात पर्यटन विकासासाठी ३३ कोटी मंजूर

By admin | Updated: April 6, 2017 01:22 IST

नाशिक : विभागातील विविध पर्यटन व धार्मिक स्थळांच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३३ कोटींहून अधिक निधीला मंजुरी दिली

नाशिक : पर्यटनाला चालना मिळण्यासाठी नाशिक विभागातील विविध पर्यटन व धार्मिक स्थळांच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३३ कोटींहून अधिक निधीला मंजुरी दिली असून, त्यातील ९ कोटी रुपयांचा निधीही तत्काळ वितरित करण्यात आला आहे. पर्यटन विकासात मात्र अहमदनगर व नंदुरबारला झुकते माप देण्यात आले असून, धुळे, नंदुरबारला पाने पुसण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पर्यटनमंत्री जयकुमार रावल व राज्यमंत्री मदन येरावार यांनी नाशिक विभागातील पर्यटन विकासाचे वीस प्रस्ताव सादर केले. त्यासाठी अंदाजीत ३३ कोटी ६८ लाख ८७ हजार रुपये खर्च अपेक्षित असून, मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावांना मान्यता देत ९ कोटी ३० लाख पाच हजार रुपये तत्काळ वितरित करण्याचे आदेशही देण्यात आले. या प्रस्तावांमध्ये नाशिक जिल्ह्णातील फक्त दोनच प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. त्यात कावनई येथील कपिलधारा येथील विकासकामे, देवळा येथील दुर्गा माता मंदिर परिसर विकासकामे अशा दोनच कामांचा समावेश असून, त्यासाठी एक कोटी ४० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील आठ कामे मंजूर करण्यात आले आहेत. त्यात नगरचा भुईकोट किल्ला विकास, हजरत मिरावली पहाड येथे रस्ता स्ट्रीट लाईट आणि प्रसादालय इमारत बांधकाम, श्री क्षेत्र देवगड येथील यात्री निवासाचे बांधकाम, निघोज ते निघोज कुंड पर्यटन स्थळाकडेजाणारा रस्ता तयार करणे, सरला बेट विकास, नेवासा तालुक्यातील कामे, नेवासा तालुक्यातील जेऊर येथील यमाई माता मंदिर परिसर सुधारणा करणे, देडगाव येथील बालाजी मंदिर परिसर सुधारणा करणे या आठ कामांचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्णातील पाचोरा नगरपरिषद क्षेत्रातील हिवरा नदीपात्रालगत श्रीराम मंदिर परिसराचा विकास करणे या एकमेव कामाचा समावेश आहे. (प्रतिनिधी)