शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

शिष्यवृत्तीसाठी ५४ हजार विद्यार्थ्यांची कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 12:45 AM

महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे रविवारी (दि. १६) नाशिक जिल्ह्यातील एकूण ३३९ परीक्षा केंद्रांवर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) घेण्यात आली. या परीक्षेला जिल्हाभरातून एकूण ५७ हजार ६४० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी सुमारे ५४ हजार ८१६ विद्यार्त्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून ही परीक्षा दिली. तर २ हजार ८२४ विद्यार्थ्यांनी या परीक्षेला दांडी मारली.

ठळक मुद्दे२ हजार ८१६ गैरहजर : दोन सत्रात ३३९ केंद्रांवर परीक्षा

नाशिक : महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे रविवारी (दि. १६) नाशिक जिल्ह्यातील एकूण ३३९ परीक्षा केंद्रांवर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) घेण्यात आली. या परीक्षेला जिल्हाभरातून एकूण ५७ हजार ६४० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी सुमारे ५४ हजार ८१६ विद्यार्त्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून ही परीक्षा दिली. तर २ हजार ८२४ विद्यार्थ्यांनी या परीक्षेला दांडी मारली.नाशिक शहरासह संपूर्ण जिल्हाभरात सकाळी ११ ते १२.३० दरम्यान २५ प्रश्नांसाठी ५० गुण असलेल्या प्रथम भाषेचा व शंभर गुणांसाठी ५० प्रश्न असलेल्या गणित विषयाचा समावेश असलेला पेपर एकसाठी परीक्षा घेण्यात आली. तर दुपारच्या सत्रात १ ते ३ वाजेच्या दरम्यान २५ प्रश्नांसाठी ५० गुण असलेल्या तृतीय भाषा, ५० प्रश्नांसाठी गुणांची बुद्धिमता चाचणी या विषयांची परीक्षा घेण्यात आली. नाशिक जिल्ह्यात पाचवीचे ३२ हजार ८६२ विद्यार्थी १८६ केंद्रांवर तर १५३ केंद्रांवर आठवीचे २४ हजार ७७८ असे एकूण ५७ हजार ६४० विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ५४ हजार ८१६ विद्यार्थ्यांनी सकाळच्या आणि दुपारच्या अशा दोन्ही सत्रातील पेपर दिले. तर २ हजार ८२४ विद्यार्थ्यांनी या परीक्षेला दांडी मारली. महाराष्ट्र परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या या परीक्षेत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण घोषित करण्यात येणार नाही. तर पात्र अथवा अपात्र घोषित करण्यात येणार आहे. प्रत्येक पेपरमध्ये किमान ४० टक्के गुण प्राप्त करणारे विद्यार्थी या परीक्षेला पात्र ठरणार असून पात्र विद्यार्थ्यांमधून गुणवत्तेनुसार व प्रचलित निकषांच्या आधारे जिल्हास्तरीय मंजूर शिष्यवृत्ती संच संख्येच्या मर्यादेत गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.पालकांची कसरतशिष्यवृत्ती परीक्षेसाठी पाल्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहचविताना पालकांना रविवारी चांगलीच कसरत करावी लागली. रस्त्यावर ठिकठिकाणी पोलिसांकडून हेल्मेट आणि क्षमताबाह्य वाहतुकीच्या कारणांमुळे पालकांना अडवले जात असल्याने पाल्यांना परीक्षा कें द्रावर वेळेच पोहोचविताना विलंब होत असल्याचे दिसून आले. शिष्यवृत्ती परीक्षेमुळे शहरात परीक्षा केंद्र असलेल्या प्रमुख शाळांच्या सकाळच्या सत्रात पाल्यांना घेऊन आलेल्या पालकांची मोठी गर्दी दिसून आली.

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षणexamपरीक्षा