शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील धरणांमध्ये ३० टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 23:26 IST

नाशिक : यंदा मान्सूनचे वेळेत आगमन होऊन पाच तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झाली असली तरी जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय अशी वाढ झाल्याचे दिसून येत नाही. जिल्ह्यात ३ जुलैअखेर ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

ठळक मुद्देपेठ-सुरगाण्याला पावसाची प्रतीक्षा । पाच तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : यंदा मान्सूनचे वेळेत आगमन होऊन पाच तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झाली असली तरी जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय अशी वाढ झाल्याचे दिसून येत नाही. जिल्ह्यात ३ जुलैअखेर ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.जिल्ह्यात अद्याप पेठ आणि सुरगाण्यात अपेक्षित अशी पावसाची नोंद झालेली नाही तर बागलाण तालुक्यात सर्वाधिक वार्षिक सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक ७८ टक्के पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. खरिपाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात असल्या तरी अनेक भागात अद्यापही बियाणांचा व खतांचा तुटवडा भासत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.जिल्ह्यात छोटे-मोठे २४ सिंचन प्रकल्प आहेत. यंदा मान्सूनचे वेळेत आगमन झाल्याने जिल्ह्यात पेठ, सुरगाणा तालुकेवगळता अन्य तालुक्यांमध्ये बºयापैकी पावसाने हजेरी लावलेली आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये सद्यस्थितीत ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.मागील वर्षी ३ जुलैअखेर अवघा ६ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यंदा मात्र समाधानकारक स्थिती आहे. प्रामुख्याने गंगापूर (४५ टक्के), पालखेड (३२ टक्के), ओझरखेड (४० टक्के), दारणा (४२ टक्के), भावली (३४ टक्के), नांदूरमधमेश्वर (८९ टक्के), हरणबारी (५१ टक्के), गिरणा (३७ टक्के) आणि पुनंद (४५ टक्के) या धरणांमध्ये ३० टक्क्यांहून अधिक साठा आहे.वाघाड, करंजवण, पुणेगाव, तिसगाव, वालदेवी, कडवा, भोजापूर, चणकापूर, केळझर, नागासाक्या या धरणांतील पाणीसाठा समाधानकारक नाही. सध्या खरिपाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात असल्या तरी काही भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अनेक भागात बियाणांचा तसेच युरियासारख्या खतांचा तुटवडा जाणवत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. गतवर्षापेक्षा ११ टक्के अधिक पाऊस जिल्ह्यात ३ जुलैअखेर २६.६२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी १५.५ टक्केपाऊस झाला होता. यंदा त्यात ११ टक्क्यांनी भर पडली आहे. जिल्ह्यातील मालेगाव (७१.९० टक्के), बागलाण (७८.४ टक्के), देवळा (५८.२२ टक्के), निफाड (७५.४३ टक्के) तर सिन्नर (५६.८८ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. पेठ-सुरगाणावगळता अन्य तालुक्यात समाधानकारक स्थिती आहे. यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज यापूर्वीच हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील दोन तालुके वगळता अन्यत्र आतापर्यंत समाधानकारक पावसाची नोंद झालेली आहे. यंदा सर्वाधिक पावसाची नोंद बागलाण तालुक्यातझालेली आहे.

टॅग्स :Rainपाऊसwater scarcityपाणी टंचाई