शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक खर्चासाठी जिल्ह्याला २६ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 01:17 IST

विधानसभा निवडणुकीसाठी होणारा कार्यालयीन खर्च भागविण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्याला कोट्यवधींचे अनुदान मंजूर केले असून, नाशिक जिल्ह्याला सुमारे २६ कोटी २५ लाख इतका निधी मिळणार आहे.

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी होणारा कार्यालयीन खर्च भागविण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्याला कोट्यवधींचे अनुदान मंजूर केले असून, नाशिक जिल्ह्याला सुमारे २६ कोटी २५ लाख इतका निधी मिळणार आहे. या संदर्भातील रकमेला शासनाने मंजुरी दिली असल्याने येत्या दोन दिवसांत ही रक्कम प्रत्येक जिल्ह्यांसाठी उपलब्ध होणार आहे.विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रि येला सुरुवात झाली असली तरी गेल्या दोन महिन्यांपासून या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील निवडणूक शाखेची प्रक्रिया सुरू झाली होती. लोकसभा निवडणूक संपल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांच्या कालावधीनंतर या संदर्भातील कामकाजाचे नियोजन सुरू झाले आणि गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात व्यापक कामकाज करण्यात आले. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदार यादी अद्ययावत करण्याची मोठी मोहीम राबविण्यात आली. यासाठी संपूर्ण जिल्हा पिंजून काढण्यात आला. जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांनादेखील सामावून घेण्यात आले.मतदारयादी शुद्धीकरण मोहिमेसाठी व्यापक मनुष्यबळ, प्रचार प्रसाराची यंत्रणा, वाहनांचे नियोजन, गावागात जनजागृती, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, त्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, जनजागृती मोहिमेसाठी लागणारे छापील साहित्य, मतदारांना आवाहन करण्यासाठी निर्माण करण्यात आलेली यंत्रणा अशा अनेक टप्प्यांवर मोठे काम करण्यात आल्याने जिल्ह्यात ५६ हजारांपेक्षा अधिक बोगस, मयतांची नावे वगळण्यात आली, तर १७ हजार नवीन मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली. यासाठी मोठ्या प्रमाणात खर्चदेखील करण्यात आला. यंदा मतदान केंद्रनिहाय काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात मतदान केंद्र सुरू करावे लागणार असल्याने त्यावरही खर्च होणार आहे. पहिल्या टप्प्यात तीन कोटी ७५ लाख, तर दुसºया टप्प्यात २२ कोटी ५० लाख असा २६ कोटी २५ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे.प्रशासन निवडणूक कामात व्यस्तसुमारे तीन ते चार महिने संपूर्ण जिल्ह्याची यंत्रणा दैनंदिन कामकाज सांभाळून निवडणुकीच्या कामात व्यस्त आहे. जसजसे मतदानाचा दिवस जवळ येत जाणार तसतशी प्रशासनाची अधिक धापवळ होणार आहे. लोकसभेच्या तुलनेत प्रशासनाला विधानसभेसाठी नियोजन आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण करावे लागते. या सर्व कामांसाठी नाशिक जिल्ह्याला कार्यालयीन खर्चासाठीचा निधी प्राप्त झाला आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय