शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

धरणात २५ टक्के साठा; १६१ टॅँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 1:06 AM

उष्णतेच्या पाऱ्याने ३६ अंश सेल्सिअस पार केल्यानंतर पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. मार्च अखेरीसच धरणातील पाणीसाठा २५ टक्क्यांवर पोहोचल्याने पाण्याचे गंभीर संकट घोंगावू लागले आहे.

नाशिक : उष्णतेच्या पाऱ्याने ३६ अंश सेल्सिअस पार केल्यानंतर पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. मार्च अखेरीसच धरणातीलपाणीसाठा २५ टक्क्यांवर पोहोचल्याने पाण्याचे गंभीर संकट घोंगावू लागले आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील ६३३ गावांमधील साडेतीन लाख लोकसंख्येसाठी १६१ टॅँकरने तहान भागविली जात आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे आता प्रशासनाकडे पाण्याचे गाºहाणे मांडण्यासाठी राजकीय पक्ष व संघटनांनीही पुढे येण्यास नकार दिला आहे.यंदा जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत फक्त ८२ टक्केच पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे पावसाळ्यातच काही तालुक्यांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला. परिणामी शासनाने जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून टंचाईच्या उपाययोजना लागू केल्या आहेत. फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्ह्यात थंडीने तग धरल्यामुळे पिण्याच्या पाण्याची फारशी मागणी नसली तरी, मार्च उजाडताच मात्र त्यात मोठी वाढ झाली आहे. विशेष करून बागलाण, चांदवड, मालेगाव, नांदगाव, सिन्नर, देवळा व येवला या सात तालुक्यांमध्ये तडाखा वाढल्यानंतर पाण्याची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत धरणातील पाणीसाठा कमालीचा कमी होत चालला असून, उष्णतेचे प्रमाण वाढताच बाष्पीभवन व गळतीमुळे जेमतेम २५ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. गेल्या वर्षी मार्च अखेर हेच प्रमाण ४४ टक्के इतके होते.नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात २६ टक्के तर समूहात ३९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. याशिवाय कडवा, भोजापूरमध्ये तीन तर भावली धरणात सहा टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. जिल्ह्णातील पाण्याच्या मागणीचा विचार करता सात तालुक्यांतील १४९ वाडे व ४८४ गावे अशा ६३३ गावांमध्ये आजच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने १६१ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी काही ठिकाणी धरणातून तर जवळपास ७४ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. गेल्या काही वर्षांनंतर पहिल्यांदाच मार्च महिन्यात टॅँकरच्या संख्येने दीडशेचा आकडा ओलांडला आहे. सुमारे साडेतीन लाख लोकसंख्येला पाण्याची गरज असून, धरणातील साठ्याचा विचार करता येणाºया तीन महिन्यांसाठी पाणी जपून वापरण्याशिवाय पर्याय नाही.तालुकानिहाय टॅँकरबागलाण-२७, चांदवड-३, देवळा-७, मालेगाव-३०, नांदगाव-२२, सिन्नर-४२, येवला तालुक्याला ३० टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी