200 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त

By Admin | Updated: February 27, 2015 23:49 IST2015-02-27T23:49:08+5:302015-02-27T23:49:23+5:30

कारवाई : सिडको आरोग्य विभागाची मोहीम

200 kg plastic bags seized | 200 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त

200 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त

सिडको : महापालिकेच्या सिडको आरोग्य विभागाच्या वतीने वापरणाऱ्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या दुकानदारांवर गुरुवारी (दि.२६) कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे २०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात येऊन दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर मनपाच्या वतीने संपूर्ण शहरात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या व्यापारी, दुकानदारांवर कारवाईची धडक मोहीम हाती घेतली आहे. गुरुवारी मनपाच्या आरोग्य विभागाच्या वतीने सिडकोतील त्रिमूर्ती चौक, राणाप्रताप चौक, शिवाजी चौक, यांसह सिडको परिसरातील व्यापारी, दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत २०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात येऊन दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
सदरची मोहीम मनपाचे सिडको आरोग्य विभागाचे प्रमुख विठ्ठल पवार यांच्यासह एस. आर. वाजपेयी, बी. आर. बागुल, आर. आर. जाधव, रावसाहेब मते, बाळासाहेब खैरणार आदिंसह शॉपअ‍ॅक्टचे डी. एन. शिंदे, राम ससाने सहभागी झाले होते. (वार्ताहर)

Web Title: 200 kg plastic bags seized