नाशिक-त्र्यंबक मार्गावर धावणार शंभर बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 12:39 AM2018-08-12T00:39:17+5:302018-08-12T00:40:51+5:30

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्री श्रावण महिन्यात भाविकांच्या भक्तीचा पूर बघावयास मिळतो. या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाने नाशिक-त्र्यंबके श्वर-नाशिक या मार्गावर सोमवारी (दि.१३) सुमारे शंभर बसेसची व्यवस्था केली आहे. या बसेस दर तासाला फेऱ्या करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

100 buses to be run on Nashik-Trimbak road | नाशिक-त्र्यंबक मार्गावर धावणार शंभर बसेस

नाशिक-त्र्यंबक मार्गावर धावणार शंभर बसेस

Next
ठळक मुद्देपहिला श्रावणी सोमवार जुन्या सीबीएस स्थानकातून नियोजन

नाशिक : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्री श्रावण महिन्यात भाविकांच्या भक्तीचा पूर बघावयास मिळतो. या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाने नाशिक-त्र्यंबके श्वर-नाशिक या मार्गावर सोमवारी (दि.१३) सुमारे शंभर बसेसची व्यवस्था केली आहे. या बसेस दर तासाला फेऱ्या करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरवर्षी महामंडळाला श्रावण महिन्यात नाशिक-त्र्यंबके श्वर या मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतुकीद्वारे उत्पन्न मिळते. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या आंदोलनामुळे महामंडळाला बुधवारी मध्यरात्रीपासून प्रवासी वाहतूक थांबवावी लागली होती. गुरुवारी दिवसभर एसटीला ‘ब्रेक’ होता. यामुळे मोठ्या प्रमाणात महामंडळाचे नुकसान झाले. हे नुकसान भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून महामंडळाने आता अधिकाधिक लक्ष ‘श्रावण सोमवार यात्रे’वर केंद्रित केले आहे. जुन्या सीबीएस स्थानकातून पहिल्या श्रावणी सोमवारी १०० बसेसची व्यवस्था केली आहे. पहिल्या श्रावणी सोमवारसाठी एकूण शंभर बसेस राखून ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, भाविकांना त्र्यंबके श्वरच्या श्रावण फेरीसाठी कुठल्याही प्रकारे अडचणी येणार नाहीत, यादृष्टीने कर्मचाºयांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. जादा बसेसच्या नियोजनानुसार पहाटेपासून बसेस त्र्यंबकेश्वरच्या दिशेने धावण्यास सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात शंभर बसेसचे नियोजन जरी करण्यात आले असले तरीदेखील भाविकांची संख्या वाढल्यास बसेसची संख्या वाढविण्याचा निर्णय जलदगतीने घेतला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. संत निवृत्तिनाथांचे समाधीस्थळ, कु शावर्त तलाव, ब्रह्मगिरी पर्वतावर दक्षिणवाहिनी गंगा अर्थात गोदावरीचा उगम असलेल्या ब्रह्मगिरी पर्वत आणि निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी श्रावण महिन्यात मोठ्या संख्येने भाविक पर्यटक त्र्यंबकेश्वरला भेट देतात. श्रावणी सोमवारच्या औचित्यावर मोठी गर्दी या तीर्थक्षेत्रात लोटते.
‘इदगाह’वरून नियोजनाची शक्यता
तिसºया श्रावणी सोमवारच्या फेरीनिमित्ताने भाविकांची होणारी गर्दी आणि मेळा बसस्थानकाचे सुरू असलेले विकासकाम लक्षात घेता महामंडळाच्या पदाधिकाºयांनी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांकडे येत्या २७ तारखेला ईदगाह मैदानावरून बसेस सोडण्याची परवानगी मागितली आहे. २२ तारखेला बकरी ईदचा सण साजरा होण्याची शक्यता आहे. इदगाह मैदान तिसºया श्रावणी सोमवारी सहज उपलब्ध होऊ शकते, असे महामंडळाचे म्हणणे आहे. याबाबत शहर वाहतूक नियंत्रण शाखेलाही पत्र दिल्याचे समजते. त्र्यंबक रस्त्याच्या बाजूने असलेल्या प्रवेशद्वारापुढे अतिक्रमण तसेच शहर बस थांबा, रिक्षा थांबाही आहे.

Web Title: 100 buses to be run on Nashik-Trimbak road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.