शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

दहा दिवसांपासून कांदा लिलाव बंद

By admin | Updated: May 1, 2017 01:13 IST

लासलगाव : कांदा लिलावाची रक्कम शेतकऱ्यांना रोख स्वरूपात देण्याच्या प्रश्नावरून मार्केट दहा दिवसांपासून असल्याने करोडो रु पयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत

लासलगाव : कांदा लिलावाची रक्कम शेतकऱ्यांना रोख स्वरूपात देण्याच्या प्रश्नावरून येथील मार्केट दहा दिवसांपासून असल्याने करोडो रु पयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. शेतकरी, स्थानिक व्यावसायिक व कांदा खळ्यात काम करणारे मजूर, ट्रॅक्टर मालक व चालक यांना यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, धान्याचे बंद झालेले लिलाव पूर्ववत सुरू झाले आहेत. बाजार समितीच्या लासलगाव मुख्य व निफाड उपबाजार आवारावर विक्र ी केलेल्या शेतमालाची चुकवती रोख अथवा एनइएफटीद्वारे अदा करण्यास व्यापाऱ्यांनी नकार दिल्याने गुरुवार, दि. २० एप्रिलपासून बाजार समितीतील कांदा लिलाव बंद राहिले. त्यानंतर निफाड उपबाजार आवारावरील कांदा व धान्याचे लिलाव पूर्ववत सुरू झाले. तसेच लासलगाव येथील धान्य लिलाव सुरू आहेत. याबाबत अधिक माहिती देताना होळकर यांनी सांगितले की, गेल्या ८ नोव्हेंबरला नोटाबंदी झाल्यानंतर पणन संचालनालय व सहकार खात्याच्या आदेशानुसार चलनपुरवठा सुरळीत होईपावेतो लासलगावसह सर्व बाजार समित्यांनी शेतमाल चुकवतीची रक्कम चेक,आरटीजीएस, एनइएफटीद्वारे करण्यास अनुमती दिली होती. दरम्यान, शेतमाल विक्र ीची रक्कम रोख अथवा एनइएफटीद्वारे अदा करण्यात यावी, अशी शेतकऱ्यांसह शेतकरी संघटनांकडून वारंवार मागणी करण्यात येत होती. शेतमालाचे वजन केल्यानंतर लगेचशेतमालाची रक्कम अदा करण्याची बाजार समितीच्या उपविधीतीत तरतूद असल्याने शेतकरी हिताच्या दृष्टीने बाजार समितीने दि. १३ मार्च पासून व नंतर दि. १ एप्रिल पासुन शेतीमाल विक्र ीची रक्कम रोख अथवा एनइएफटी द्वारे अदा करण्याच्या सूचना व्यापारी वर्गास दिल्या होत्या. नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये रोख व एनइएफटी द्वारे शेतीमाल चुकवती सुरू झाल्याने इतर बाजार समित्यांप्रमाणेच येथील व्यापारी वर्गाने कार्यवाही करावी यासंदर्भात बाजार समितीने लासलगांव मर्चन्टस असोशिएशनच्या सभासदांशी ३ वेळा चर्चा करून देखील व्यापारी वर्ग चेकद्वारेच चुकवती करीत असल्याचे बाजार समितीच्या निदर्शनास आले. बाजार समितीने असोशिएशनला कळविल्यानंतर मर्चन्टस असोशिएशनने चर्चा करण्याची बाजार समितीस पत्राद्वारे विनंती केल्याने बाजार समितीने बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. त्यात व्यापारी भूमिकेवर ठाम राहिले़