शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

कुंभमेळ्याच्या ब्रॅण्डिंगसाठी शासनाकडून १० कोटी रुपये

By admin | Updated: August 20, 2015 00:03 IST

कुंभमेळ्याच्या ब्रॅण्डिंगसाठी शासनाकडून १० कोटी रुपये

वरातीमागून घोडे : विभागीय आयुक्तांना अधिकारनाशिक : नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सुरू असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बॅ्रण्डिंग तसेच प्रसिद्धीसाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने तब्बल १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून तो विभागीय आयुक्तांकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, कुंभमेळा सुरू होऊन महिना लोटल्यानंतर शासनाचे वरातीमागून घोडे हाकण्याच्या प्रकाराबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पुढील वर्षी उज्जैन येथे होणाऱ्या कुंभमेळ्याचे ब्रॅण्डिंग मध्य प्रदेश सरकारने नाशिक येथे कधीच सुरू करून दिले आहे. मात्र, नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे १४ जुलैपासून सुरू झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे बॅ्रण्डिंग व प्रसिद्धीसाठी राज्य शासनाने आताशा कुठे १० कोटी रुपयांचा निधी देण्याचे शहाणपण दाखविले आहे. नाशिक व त्र्यंबकेश्वर ही तीर्थक्षेत्रे म्हणून विकसित करण्यासाठी, तसेच कुंभपर्वाचा त्यासाठी उपयोग करून घेण्यासाठी प्रसिद्धीची गरज पाहता राज्य शासनाने १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सदर निधी विभागीय आयुक्तांकडे सुपूर्द केला जाणार असून, तेच नियंत्रण अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहेत. विभागीय आयुक्तांना आता ब्रॅण्डिंगसाठी एक आराखडा तयार करून तो माहिती व जनसंपर्क महासंचालकांकडून मान्य करून घ्यावा लागणार आहे. दरम्यान, प्रसिद्धी अथवा ब्रॅण्डिंगसाठी कोणत्याही कामाकरिता निविदाप्रक्रियेचाच अवलंब करण्याची सूचना करण्यात आली असून, तीन लाखांपेक्षा जास्त खर्चाच्या बाबीसाठी ई-निविदाप्रक्रिया राबविण्याचे आदेशित करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)