युनूस पठाण यांना शासनाचा गुणवंत अधिकारी पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 12:03 IST2020-03-05T12:03:18+5:302020-03-05T12:03:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : राज्य शासनाचा गुणवंत अधिकारी पुरस्कार नंदुरबार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी ...

Yunus Pathan Awarded the Government's Quality Officer | युनूस पठाण यांना शासनाचा गुणवंत अधिकारी पुरस्कार

युनूस पठाण यांना शासनाचा गुणवंत अधिकारी पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : राज्य शासनाचा गुणवंत अधिकारी पुरस्कार नंदुरबार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. युनूस गोहरखान पठाण यांना जाहीर झाला आहे.
शासनाने बुधवारी गुणवंत अधिकारी, कर्मचारी पुरस्कार जाहीर केले. त्यात नाशिक विभागातून डॉ. युनूस पठाण यांची निवड करण्यात आली आहे. डॉ.पठाण यांनी शिक्षण विभागात १२ वर्ष सेवा केली आहे. त्यांनी आंतरराष्टÑीय शाळा उभारणी, मॉडेल स्कूल, गर्ल्स होस्टेल, ग्रंथोत्सव, इन्स्पायर अवार्ड,, विद्यार्थी सानुग्रह अनुदान, माध्यमिक शिक्षा अभियान वार्षीक आराखडा तयार करणे व अंमलबजावणीत महत्वाची भुमिका बजावली आहे.
गुणवत्ता विकास कार्यक्रम, लोकसभा व विधानसभा निवडणुकीत एसव्हीईईपी उपक्रम अंमलबजावणी, अल्पसंख्याक विकास विभाग पायाभूत सुविधा लाभ व त्यांच्या गुणवत्ता विकासासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत.
या सर्व कामांची दखल घेवून त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. १२ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, शिक्षणाधिकारी एम.व्ही.कदम, भानुदास रोकडे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Web Title: Yunus Pathan Awarded the Government's Quality Officer