मैदानात व्यायाम करता येणार, जीम मात्र बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 12:18 PM2020-06-06T12:18:37+5:302020-06-06T12:18:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मिशन बिगीन अगेन या अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा काही बाबींना सूट दिली आहे. इतर नियम ...

You can exercise on the field, but the gym is closed | मैदानात व्यायाम करता येणार, जीम मात्र बंदच

मैदानात व्यायाम करता येणार, जीम मात्र बंदच

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मिशन बिगीन अगेन या अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा काही बाबींना सूट दिली आहे. इतर नियम व निर्देश पूर्वीप्रमाणेच कायम राहणार असल्याचे या नव्या आदेशात म्हटले आहे.
लॉकडाऊनच्या चालू टप्प्याअंतर्गत मिशन बिगीन अगेन सुरू करण्यात आले आहे. त्यात विविध बाबींना सूट देण्यात आली आहे. जिल्ह्यात यापूर्वी दिलेल्या सूट व निर्बंध कायम ठेवून या नवीन बाबींचा समावेश करण्यात येणार आहे. याबाबत दिलेल्या निर्देशात जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी म्हटले आहे की, मिशन बिगीन अगेन अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात बाहेरील आवारात/मैदानात व्यायाम करण्याची परवानगी असेल. मात्र यावेळी व्यायामाचे कोणतेही साहीत्य, गार्डन मधील जीम, ओपन एअरजीम वापरता येणार नाही.
शैक्षणिक संस्थाचे (शाळा,कॉलेज,विद्यापीठ) कर्मचारी विद्यार्थ्यांना शिकविण्याव्यतिरिक्त इतर गोष्टीसाठी कार्यालयीन कामकाज सुरु ठेवू शकतात. त्यात ई-कन्टेंट विकसीत करणे, उत्तर पत्रिकांचे मुल्यमापन आणि निकाल जाहीर करणे यांचा समावेश राहणार असल्याचेही आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.


 

Web Title: You can exercise on the field, but the gym is closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.