शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

यंदा श्रावण २९ दिवसांचा; मंदिरात प्रवेश मिळणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:19 IST

यंदा श्रावण महिना ९ ऑगस्‍टपासून सुरू होत आहे. ६ सप्‍टेंबरपर्यंत हा महिना असणार आहे. श्रावण महिन्यात मंदिरावर अवलंबून असणाऱ्या ...

यंदा श्रावण महिना ९ ऑगस्‍टपासून सुरू होत आहे. ६ सप्‍टेंबरपर्यंत हा महिना असणार आहे. श्रावण महिन्यात मंदिरावर अवलंबून असणाऱ्या हार, फुले, मिठाई, नारळ या विक्रेत्यांचा व्यवसायदेखील चांगला होतो. या विक्रीमुळे आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होते. मात्र, यंदा त्यांच्या पदरी निराशाच येणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

श्रावण सोमवार

पहिला - ९ ऑगस्ट, दुसरा - १६ ऑगस्ट, तिसरा - २३ ऑगस्ट, चौथा -३० ऑगस्ट,

९ ऑगस्‍टपासून श्रावण महिना सुरू होत आहे. महिनाभर सर्व मंदिरांमध्ये पूजा-अर्चा होत असते. या काळात मंदिर परिसरात आर्थिक उलाढाल वाढत असते. विशेषतः सोमवारी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मात्र, यंदा कोरोनामुळे मंदिरे उघडली नसल्याने भक्तांना देवाच्या दर्शनाविनाच श्रावण महिना काढावा लागणार आहे. कोरोनाचा संसर्ग रोखणे गरजेचे असले तरीदेखील मंदिरावर अवलंबून असणाऱ्या अनेक कुटुंबांचा या महिन्यात व्यवसाय बुडणार आहे.

मंदिरात येणाऱ्या भक्तांवरच आमचा व्यवसाय अवलंबून असतो. मागील दोन वर्षे व्यवसाय पूर्णपणे ठप्प असल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. सरकारने आमच्या व्यथांकडे लक्ष द्यावे. तसेच मंदिरांवर व्यवसाय अवलंबून असलेल्यांना आर्थिक मदत करावी.

- भूषण पाटील, नारळ विक्रेते

हारांचा व्यवसाय हा आमचा कौटुंबिक व्यवसाय आहे. घरातील सर्व सदस्य मिळून हा व्यवसाय चालवितो. त्यामुळे या व्यवसायावरच आमची उपजीविका चालते. मात्र, मंदिर बंद असल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने आमच्या व्यथा लक्षात घेऊन मंदिरे लवकरात लवकर सुरू करावीत.

- योगेश माळी, हार विक्रेते