बर्डीपाडा येथे याहामोगी मातेचा यात्रोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 12:34 PM2020-02-19T12:34:26+5:302020-02-19T12:34:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा येथील धामणदोरी यहामोगी मातेची महाशिवरात्रीनिमित्त यात्रा २१ ते २३ फेब्रुवारीपर्यंत भरविण्यात ...

Yamamogi Mother's Festival in Bardipada | बर्डीपाडा येथे याहामोगी मातेचा यात्रोत्सव

बर्डीपाडा येथे याहामोगी मातेचा यात्रोत्सव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा येथील धामणदोरी यहामोगी मातेची महाशिवरात्रीनिमित्त यात्रा २१ ते २३ फेब्रुवारीपर्यंत भरविण्यात येत असून, परिसरातील भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
बर्डीपाडा येथील डोंगरावरील धामणदोरी येथे आदिवासी समाजाची कुलदैवता यहामोगी माता प्रकट झाल्यापासून अद्यापपर्यंत प्रत्येक वर्षी आदिवासी रूढी परंपरेप्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त यात्रेचे आयोजन करण्यात येऊन येथील पुजारी जामसिंग गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
२१ फेब्रुवारीपासून यात्रा भरविण्यात येत आहे. या वेळी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. २० रोजी सायंकाळी भजन कीर्तनास प्रारंभ होणार आहे तर २१ रोजी १२ वाजेला शिवपूजा करण्यात येवून दोन दिवस रात्री सोंगाडड्या पार्टीचे आयोजन केले आहे. २२ रोजी दुपारी चार वाजता मातेची हेलादाब रितीरिवाजानुसार विधिवत पूजा करण्यात येणार आहे.
गेल्या १५ वर्षांपासून सुरू असलेल्या धामणदोरी डोंगराच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत साडेसात हजार फूट उंचीवरील याहामोगी देवमोगरा मातेचे मंदिर भक्तांचे आकर्षण आहे. देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना डोंगरमाथ्यावरील तीन हजार उंच पायऱ्या चढाव्या लागतात. या पायऱ्यांची देखभाल व रस्त्यांची दुरुस्ती गावातील भाविकांद्वारे करण्यात येते. ढोरपाडा गावापासून यात्रेच्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी मातीचा रस्ता असून, भाविकांना येण्या-जाण्यासाठी अडचण निर्माण होते. त्यामुळे शासनाकडून मंजूर झालेल्या या रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे अशी मागणी पुजारी जामसिंग गावीत व भाविकांनी केली आहे.
परिसरातील भाविकांनी याहामोगी माता, दर्शनाचा व तीर्थप्रसादाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आव्हान पुजारी जामसिंग गावीत यांनी केले आहे.

Web Title: Yamamogi Mother's Festival in Bardipada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.