शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सामोडे येथील कोरोनाबाधिताने केले प्रकाशा येथील तापी घाटावर पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा/लहान शहादे : सामोडे ता़ साक्री येथील कोरोनाबाधित व्यक्तीने प्रकाशा ता़ शहादा येथे धार्मिक विधीसाठी तापी ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा/लहान शहादे : सामोडे ता़ साक्री येथील कोरोनाबाधित व्यक्तीने प्रकाशा ता़ शहादा येथे धार्मिक विधीसाठी तापी घाटावर हजेरी लावली होती़ यादरम्यान बाधिताच्या संपर्कात आलेल्या विखरण ता़ नंदुरबार येथील पुजाऱ्यासह १९ जणांना क्वारंटाईन करण्यात आले असून या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे़दक्षिण काशी प्रकाशा येथे तापी संगमावर धार्मिक विधींसह अस्थी विसर्जनासाठी शेकडोंच्या संख्येने नागरिक वर्षभरात हजेरी लावतात़ लॉकडाऊनकाळातही येथे हे उपक्रम सुरु आहेत़ दरम्यान १७ जून रोजी साक्री तालुक्यातील सामोडे येथील ४२ वर्षीय व्यक्ती लहान भावाच्या अस्थी विसर्जनासाठी खाजगी वाहनाने आला होता़ सोबत त्याने विखरण ता़ नंदुरबार येथील एका पुजाºयास आणले होते़ दोघांनीही प्रकाशा येथील घाटावर बसून पूजा विधी करत नदीपात्रात अस्थींचे विसर्जन केले होते़ यानंतर बाधित व्यक्ती परत गेला होता़ मात्र १८ जून रोजी प्रकृती खराब झाल्याने त्याने उपचार घेतले होते़ यातून तो पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्याने सामोडे गावात खळबळ उडाली होती़ ही माहिती प्रकाशा येथील ‘लोकमत’ प्रतिनिधीला मिळाल्यानंतर त्यांनी तहसीलदार यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती़ त्यानुसार बाधिताच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यात आला़ यातून प्रकाशा येथील एकही जण संपर्कात नसल्याचे स्पष्ट झाले असून विखरण ता़ नंदुरबार येथील पुजारीला क्वारंटाईन सेंटरमध्ये दुपारी रवाना करण्यात आले़ दरम्यान पुजाºयाच्या संपर्कात आलेल्या १९ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे़ तालुका आरोग्य विभागाचे पथक दिवसभर येथे ठाण मांडून होते़ ग्रामपंचायत सरपंच सुमनबाई पाटील, संजय पाटील, पोलीस पाटील प्रकाश पाटील, उपसरपंच सुपडू ठाकूर यांनी प्रशासनाला सहकार्य केले़ गावात आरोग्य सर्वेक्षण सुरु झाले असून निर्जंतुकीकरण व फवारणी करण्यात येत आहे़प्रकाशा येथे कोरोनाबाधिताने हजेरी दिल्याच्या माहितीनंतर तलाठी धर्मराज पाटील, ग्रामसेवक बी.जे.पाटील, केदारेश्वर मंदिर संस्थानचे अध्यक्ष रामचंद्र पाटील, नंदलाल पटेल, मंदिराचे पुजारी रविंद्र गुरव, नरेंद्र्र गुरव आदींनी तापी घाटावर जावून पाहणी केली होती़ यावेळी स्थानिक नावाडींना सूचना करण्यात येऊन उपाययोजना करण्याबाबत माहिती देण्यात आली़ धार्मिक विधींसाठी येथे येणाऱ्यांनाही सूचना केल्या जाणार आहेत़प्रांताधिकारी डॉ़ चेतन गिरासे व तहसीलदार डॉ़ मिलींद कुळकर्णी यांनी साक्री तालुक्याच्या तहसीलदारांसोबत संपर्क करुन कोरोनाबाधिताची माहिती जाणून घेत संपर्क साखळीची चौकशी केली होती़ यातून विखरण येथील एकजण संपर्कात आल्याची माहिती स्पष्ट झाली होती़