शहादा महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 02:04 PM2020-01-15T14:04:33+5:302020-01-15T14:04:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे ...

Workshop for students at Shahada College | शहादा महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी कार्यशाळा

शहादा महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी कार्यशाळा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने युवती सभेअंतर्गत विद्यार्थिनी व्यक्तिमत्व विकास या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली.
कार्यशाळेचे उद्घाटन नवनिर्वाचित जि.प. सदस्या जयश्री दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.आर.एस. पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून अ‍ॅड.स्मिता जैन, प्रवीणा कुलकर्णी, सुवर्णा जगताप, उपप्राचार्या इंदिरा पटेल, पर्यवेक्षिका प्रा.कल्पना पटेल, प्रांजल पाटील, वंदना पाटील, उपप्राचार्य डॉ.एम.के. पटेल, अंनिसचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे, तुषार शिंदे आदी उपस्थित होते.
या वेळी लोणखेडा जिल्हा परिषद गटातून विजयी झालेल्या जयश्री पाटील यांचा युवती सभेच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ.पाटील म्हणाले की, विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध उपक्रमांचे महाविद्यालयात आयोजन केले जाते. युवती सभेच्या माध्यमातून विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास व सकारात्मक दृष्टीकोन निर्माण केला जात असतो असे सांगून निरोगी व यशस्वी आयुष्यासाठी त्यांनी दहा सूत्रे विशद केली.
द्वितीय सत्रात विनायक साळवे, अ‍ॅड.स्मिता जैन, प्रवीणा कुलकर्णी, सुवर्णा जगताप यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत विद्यार्थिनींनी विचारलेले प्रश्न व शंकांचे मान्यवरांनी निरसन केले. कार्यशाळेत १५० विद्यार्थिनी उपस्थित होत्या. प्रास्ताविक युवती सभेच्या संयोजिका डॉ.वर्षा चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन उत्कर्षा निकम तर आभार शुभांगी परदेशी हिने मानले. कार्यशाळेसाठी डॉ.प्रशांत तोरवणे, प्रा.आर.एस. माळी, सुनील भांडारकर, गोपाळ सोनार, जितेंद्र चव्हाण, गणेश पाटील, भरत पाटील आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Workshop for students at Shahada College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.