शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
4
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
5
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
6
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
7
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
8
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
9
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
10
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
11
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
12
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
13
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
14
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
15
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
16
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
17
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
18
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
19
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
20
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
Daily Top 2Weekly Top 5

अधिपरिचारीकांबाबत शासनाचा दुजाभावमुळे कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 11:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विविध मागण्यांसाठी बंधपत्रीत अधिपरिचारिकांनी सोमवारी विविध मागण्यांसाठी एक दिवसाचे कामबंद आंदोलन पुकारले आहे. या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विविध मागण्यांसाठी बंधपत्रीत अधिपरिचारिकांनी सोमवारी विविध मागण्यांसाठी एक दिवसाचे कामबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाची दखल न घेतल्यास सामुहिक विनावेतन रजेवर जाऊन साखळी उपोषणाचा इशारा आंदोलक अधीपरिचाकांनी दिला आहे.याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोन वर्षासाठी बंधपत्र नियमित वेतनानुसार पुर्ण करून दिले आहे. त्यानंतर पुढे ११ महिने याप्रमाणे सर्व अधिपरिचारीका कार्यरत होते. त्यानंतर ११ महिन्यांऐवजी ६ महिने बंधपत्र करण्यात आले. गेल्या पाच वर्षांपासून सेवा बजावली जात आहे. असे असतांना अचानक सेवार्थ प्रणालीमधून वगळून मानधनावर ठेवले जात आहे.बंधपत्रधारक अधिपरिचारिका कोवीड-१९ मध्ये नियमाप्रमाणे आणि समर्पण भावाने काम करीत आहेत. असे असतांनाही मानधन आता कमी करण्यात आले आहे. २०१५ पर्यंतच्या बंधपत्रधारक परिचारिकांना नियमित सेवेत सामावून घेतले आहे. त्याअनुषंगाने आम्हालाही नियमित शासन सेवेत सामावून घ्यावे.सरळ सेवेत सामावून घेत नाही तोपर्यंत सहा महिन्याऐवजी ११ महिन्याचे आदेश मिळावे. वार्षीक वेतनात १० टक्के वाढ मिळावी. सातवा वेतन लागू झाला तेंव्हापासून आतापर्यंतचा फरक मिळावा. मानधन पद्धतीचा शासन निर्णय रद्द करावा यासह इतर मागण्या यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आर.डी.भोये यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दुपारनंतर परिचारिका कामावर आल्याचे सांगण्यात आले. या आंदोलनामुळे बंधपत्रधारक परिचारकांच्या मागण्यांकडे लक्ष वेधले गेल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.