शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
6
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
7
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
8
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
9
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
10
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
11
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
12
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
13
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
14
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
15
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
16
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
17
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
18
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
19
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
20
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

मजुरांना स्थानिक ठिकाणीच काम उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 11:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोळदा व दुधाळे येथे जलसंधारण दिनाचे औचित्य साधून गाव तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोळदा व दुधाळे येथे जलसंधारण दिनाचे औचित्य साधून गाव तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते करण्यात आला. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मजुरांना आपल्या गावातच काम मिळावे, या हेतूने कामाला सुरुवात करण्यात आली.कोरोना विषणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संपूर्ण देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. यात मजुरांच्या हाताला काम मिळेनासे झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मजुरांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध कामे हाती घेतली आहेत. आज महाराष्ट्र जलसंधारण दिनाचे औचित्य साधून नंदुरबार तालुक्यातील कोळदा येथील मजूरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने गाव तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कोळदा येथील १७५ तर दुधाळे येथील ९७ मजुर उपस्थित होते. त्यांना याठिकाणी महिनाभर पुरेल एवढे काम उपलब्ध होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, नंदुरबार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक पटाईत, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश वळवी, सुभाष राजपूत, ग्रामविस्तार अधिकारी भैय्या निकम, ग्राम विकास अधिकारी संजय देवरे, ग्रामसेवक गणेश मोरे यांच्यासह अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पालन करून हे काम सुरू करण्यात आले आहे. मजुरांना कामाच्या ठिकाणी तोंडाला रुमाल बांधूनच काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. सुरक्षित अंतर ठेवून काम करताना स्वत:ची व परिवाराच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहनही केले.

जिल्हाभरात रोजगार हमी योजनेची विविध कामे सुरू करण्यात आली असून, मजुरांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५९७ ग्रामपंचायतींपैकी ३९३ ग्रामपंचायतींमध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे सुरू आहेत. त्यात वैयक्तिक लाभाची ४ हजार १६९ कामे सुरू असून, येथे १५ हजार ४२० मजूर कामावर आहेत. तर २०१ सार्वजनिक कामांवर ५ हजार ३६२ मजूर कार्यरत आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण ४,३७० कामांवर २० हजार ७८२ मजूर उपस्थित आहेत. उर्वरित मजुरांनाही कामे उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाकडून ग्रामपंचायत पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मजुरांनी आपल्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधून रोजगार उपलब्ध करून घ्यावा.