पतीच्या छळाला कंटाळून पत्नीची आत्महत्या

By Admin | Updated: May 16, 2017 17:40 IST2017-05-16T17:40:34+5:302017-05-16T17:40:34+5:30

पीडित विवाहिता दोन दिवसांपासून बेपत्ता होती़

Wife commits suicide due to husband's harassment | पतीच्या छळाला कंटाळून पत्नीची आत्महत्या

पतीच्या छळाला कंटाळून पत्नीची आत्महत्या

ऑनलाइन लोकमत

नंदुरबार, दि. 16 - पतीकडून सातत्याने होणा:या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली़ पीडित विवाहिता दोन दिवसांपासून बेपत्ता होती़  
कौलवीमाळ बोंडीपाडा ता़ अक्कलकुवा येथील भरत रावजी तडवी यांची कन्या मनिषा उर्फ मांगी भरत तडवी हिचा विवाह कोठली ता़ अक्कलकुवा येथील देवजी संपा पाडवी याच्यासोबत झाला होता़ विवाहाच्या काही दिवसांनंतरच देवजी पाडवी व संपा पाडवी हे पिता-पुत्र मनिषाचा छळ करत होत़े ही बाब मनिषाने माहेरी सांगितली होती़ मात्र माहेरच्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल़े दररोज होणा:या त्रासाला कंटाळून  दोन दिवसांपूर्वी मनिषा तडवीने कोठली येथे पतीचे घर सोडले होत़े पोलिसांकडून विवाहितेचा शोध घेतला जात असतानाच कुवा ते कोठली गावादरम्यान दरीमध्ये झाडाला गळफास घेतल्याच्या अवस्थेत मनिषा तडवीचा मृतदेह आढळून आला़ मयत मनिषाने 13 ते 15 मे दरम्यान गळफास घेतल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आह़े

Web Title: Wife commits suicide due to husband's harassment