शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना कसले नियम? ठाण्यासमोर भररस्त्यावर होते वाहनांची ‘पार्किंग’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:20 IST

नंदुरबार : शहरात एकूण चार पोलीस ठाणी आहेत. यातील एक पोलीस ठाणे हे शहराबाहेर सुसज्ज अशा इमारतीत तर तीन ...

नंदुरबार : शहरात एकूण चार पोलीस ठाणी आहेत. यातील एक पोलीस ठाणे हे शहराबाहेर सुसज्ज अशा इमारतीत तर तीन पोलीस ठाणी शहरातील मध्यवर्ती भागात आहेत. या पोलीस ठाण्यांमध्ये पार्किंग करण्यासाठी मनाई असल्याने पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि येथे येणारे नागरिक बाहेर वाहन पार्किंग करत आहेत. यातून या पोलीस ठाण्यांबाहेरच बेशिस्ती दिसून येत आहे.

शहरातील तीन पोलीस ठाणे परिसरात भेटी दिल्या असता, पोलीस ठाण्याच्या आवारात वाहने लावण्यास जागा नसल्याने बाहेरच वाहने लावल्याचे दिसून आले. शहरात २०२०-२०२१ या वर्षात नो पार्किंगच्या दीड हजार केसेस करण्यात आल्या आहेत. त्यापूर्वी नो पार्किंगच्या कारवाया मात्र शहरात खूप अशा होत नव्हत्या. परंतु यंदाच्या वर्षात कोरोनामुळे बाजारात वेळोवेळी होणारी गर्दी वाहतूक कोंडी करणारी ठरत असल्याने या कारवायांना गती देण्यात आली होती.

ज्या ठिकाणी नो पार्किंग त्या ठिकाणीच होतेय वाहनांची पार्किंग

शहरातील नेहरू चाैकात शहर पोलीस ठाणे आहे. या ठिकाणी पूर्वी तहसील कार्यालय होते. हीच जागा आता पोलीस ठाण्याला दिली आहे. दरम्यान, या ठिकाणी पार्किंगला जागा नसल्याने वाहने बाहेर लावली जातात. विशेष म्हणजे समोरील भिंतीवर नो-पार्किंगची सूचना केली गेली आहे.

शहर वाहतूक शाखेचे कार्यालय आता शहर पोलीस ठाण्याच्या जुन्या इमारतीत स्थलांतरित झाले आहे. या ठिकाणी पार्किंगसाठी जागा नसल्याने कर्मचारी वाहने बाहेरच लावतात. वाहतूक शाखेची वाहनेही बाहेरच उभी राहतात.

शहर पोलीस ठाणे

शहर पोलीस ठाणे हे सर्वाधिक व्यस्त पोलीस ठाण्यांपैकी एक आहे. नेहरु चाैकातील हमरस्त्याला लागून हे ठाणे आहे. या ठिकाणी बाहेरच भिंतीसमोर वाहने लावली जातात. यातून कधीकधी येथे वाहतूक कोंडी होते.

वाहतूक शाखा

वाहतूक शाखेकडे चारचाकी वाहने देण्यात आली आहेत. गांधीपुतळा रोडवरील या ठाण्याबाहेर कर्मचारी व अधिकारी त्यांची वाहने उभी करतात. यातून येथेही वाहतुकीस अडथळा निर्माण होतो.

नंदुरबार शहरात नो पार्किंगच्या कारवाया केल्या जात आहेत. २०१६ ते २०२१ या काळात १ हजार ६०२ कारवाया झाल्या आहेत. यात सर्वाधिक कारवाया ह्या २०२०-२१ या वर्षातील आहेत. येत्या काळातही कारवाई सुरु ठेवणार आहोत.

-अविनाश मोरे

पोलीस निरीक्षक, नंदुरबार.