कोरोनामुक्त पोलीसाचे बँड लावून स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 12:36 IST2020-05-18T12:36:14+5:302020-05-18T12:36:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मालेगाव येथे कर्तव्य बजावत असताना कोरोनाचा संसर्ग झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याला जिल्हा रुग्णालयाने डिस्चार्ज दिला ...

Welcome to the Corona Free Police Band | कोरोनामुक्त पोलीसाचे बँड लावून स्वागत

कोरोनामुक्त पोलीसाचे बँड लावून स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मालेगाव येथे कर्तव्य बजावत असताना कोरोनाचा संसर्ग झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याला जिल्हा रुग्णालयाने डिस्चार्ज दिला आहे़ कर्मचाºयाचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर रविवारी सायंकाळी संबधित कर्मचाºयाला घरी सोडण्यात आले़ यावेळी पोलीस कर्मचाºयाचे पोलीस बँडच्या सुरावटींवर स्वागत करण्यात आले़ पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी कोरोनामुक्त कर्मचाºयाचे कक्षाबाहेर स्वागत केले़
यावेळी परीक्षाविधीन सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर.डी. भोये, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, पोलीस उपअधीक्षक (गृह ) सिताराम गायकवाड, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. के.डी. सातपुते ,डॉ. राजेश वसावे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. जे.आर. तडवी, गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे शिरीष जाधव, शहर पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर आदी उपस्थित होते.
एप्रिल महिन्यात जिल्ह्यातून मालेगाव येथून परतलेल्या पोलीस कर्मचाºयात कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने त्याला क्वारंटाईन करण्यात आले होते़ संबधित कर्मचाºयाचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्यानंतर त्याला आयसोलेश वॉर्डात दाखल करण्यात आले होते़ याठिकाणी सलग सुरु असलेल्या उपचारांना प्रतिसाद मिळाल्याने कर्मचारी कोरोनामुक्त झाला़ आयसोलेशन वॉर्डात दाखल असलेल्या पोलीस कर्मचाºयाचा तिसरा अहवाल निगेटिव्ह आला होता़ यातून रुग्णालय प्रशासनाने त्यांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेतला होता़ रुग्णालयातून बाहेर पडताना पोलीस दलाने केलेल्या स्वागताने कर्मचारीही भारावून गेला होता़ जिल्ह्यात १८ रुग्ण संसर्गमुक्त झाले असून इतर २ रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस कर्मचाºयाच्या घरीही उत्साहात स्वागत करण्यात आले़ याठिकाणी पोलीस बँड उपस्थित होता़

Web Title: Welcome to the Corona Free Police Band