शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ‘साडेआठ लाख’ बालकांचे ‘वेट लॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 12:46 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्वच अंगणवाड्या सध्या बंद असल्याने दोन महिन्यांपासून अंगणवाडीतील बालकांची ...

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्वच अंगणवाड्या सध्या बंद असल्याने दोन महिन्यांपासून अंगणवाडीतील बालकांची वजन-उंची घेण्याची प्रक्रिया थांबली आहे. विशेषत: मार्च ते मे हा कुपोषणाचा हॉट पिरीयड मानला जातो. याच काळात शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण व देखभालीच्या प्रक्रियेलाही मर्यादा आल्याने कुपोषणाचे प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.कोरोनामुळे गेल्या पावणेदोन महिन्यापासून राज्यात लॉकडाऊन आहे. साहजिकच सर्वच व्यवहार बंद झाले आहेत. शाळा-महाविद्यालयांप्रमाणे अंगणवाड्याही बंद आहेत. खास करून अंगणवाड्यातील बालकांवर मार्च ते जून या काळात अधिक लक्ष केंद्रीत करावे लागते. याच काळात कुपोषणाचे प्रमाणही वाढत असल्याचा आजवरचा अनुभव आहे. अशा स्थितीतच कोरोनामुळे दोन महिन्यांपासून अंगणवाडींमधील बालकांचे वजन घेणे, उंची मोजणे तसेच रोजचा पोषण आहार, आरोग्य तपासणी व इतर उपाययोजना सर्वच बंद झाले आहे. काही प्रक्रिया सुरू असल्या तरी त्या अनियमित झाल्या आहेत.राज्यात अंगणवाडींमध्ये जवळपास साडेआठ लाखांपेक्षा अधिक बालकांचे नियमित वजन घेतले जाते. दर महिन्याला बालकांची वजन व उंची मोजून त्यानुसार सॅम आणि मॅमच्या बालकांचा दर्जा ठरवला जातो. कमी वजन असलेल्या बालकांची विशेष काळजी घेऊन त्याचे वजन कसे वाढेल याकडे लक्ष घातले जाते. कुपोषित बालकांना सर्वसाधारण बालकांच्या गटात आणण्याचा प्रयत्न केला जातो. राज्यात सद्यस्थितीत अतीतिव्र कुपोषित ४१ हजारपेक्षा अधिक बालके आहेत. तर मध्यम कुपोषित दीड लाखाहून अधिक बालके आहेत. शिवाय सर्वसाधारण गटात साडेसहा लाखाहून अधिक बालके आहेत. या बालकांवरील प्रशासनाचे नियंत्रण गेल्या दोन महिन्यांपासून दुरावले आहे. लॉकडाऊनमुळे पोषण आहारचा पुरवठा बालकांच्या पालकांपर्यंत पोहोचविण्याचा दावा प्रशासनाचा असला तरी दुर्गम-अतिदुर्गम भागात तो सर्वांपर्यंत पोहोचला की नाही, पोहोचला असेल तर घरी या बालकांना अंगणवाडीमध्ये जसा नियंत्रित पद्धतीने आहार दिला जातो तसा दिला गेला की नाही? बालकाच्या वयोमानाच्या टप्प्यावर दिले जाणाऱ्या लसी दिल्या गेल्या नाहीत, यावेळी अंगणवाडीत बालकाच्या आरोग्याच्या तपासणीबाबत निर्णय होतो ती प्रक्रिया थांबली आहे. अशा कितीतरी कारणांमुळे बहुतांश बालके कमी वजनाच्या गटात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुपोषणाचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लॉकडाऊनमुळे अंगणवाड्यांमधील वजन व उंची घेण्याचे काम बंद आहे़ तसेच दरवर्षी एप्रिल महिन्यात नवीन बालकांचे सर्वेक्षण केले जाते़ ते कामही यंदा होवू शकलेले नाही़ राज्यशासनाचे नुकतेच अंगणवाडी केंद्र क्वारंटाईन कक्षासाठी वापरु नये असे आदेश आले आहेत़ बालकांचे वजन व उंची सध्याच्या परिस्थितीत कशा प्रकारे घ्यावी याबाबतच्या मार्गदर्शक सूचना शासनाकडून प्राप्त होताच कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांनी दिली़