शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय शिक्षण मंडळाच्या जिल्हा शाखेतर्फे वेबिनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:31 IST

या वेबिनारसाठी देवगिरी प्रांत अध्यक्ष डॉ.सर्जेराव ठोंबरे, कार्यवाह प्राचार्य डॉ.मकरंद पैठणकर, वेबिनारचे प्रमुख साधन व्यक्ती म्हणून प्रा.डॉ. माहेश्वर कालवे, ...

या वेबिनारसाठी देवगिरी प्रांत अध्यक्ष डॉ.सर्जेराव ठोंबरे, कार्यवाह प्राचार्य डॉ.मकरंद पैठणकर, वेबिनारचे प्रमुख साधन व्यक्ती म्हणून प्रा.डॉ. माहेश्वर कालवे, प्रांत उपाध्यक्ष पंकज पाठक, सहकार्यवाह प्रा.डाॅ.उमेश शिंदे व नंदुरबार जिल्हाध्यक्ष प्राचार्य डॉ. आर.एस. पाटील उपस्थित होते.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या बदलाबाबत प्रा.डॉ.कालवे यांनी अनेक बाबींवर विश्लेषण केले. देशातील शिक्षणाचे प्रमाण वाढले, शाळा व कॉलेज यांचे संख्यात्मक प्रमाणही वाढले. असे असले तरी गुणवत्तेच्या बाबतीत काही प्रश्नचिन्ह आहेत. शैक्षणिक धोरणातील ठळक बाबी जसे पूर्व प्राथमिक शिक्षणाकडे विशेष लक्ष, व्यावसायिक शिक्षणाची आवश्यकता यासह बालकांच्या जडणघडणीला पूर्वप्राथमिक शिक्षणाचे महत्त्व, शालेय शिक्षण, अंगीभूत शिक्षण म्हणून कौशल्य विकास आर्थिक विकासात मदत करण्याच्या दृष्टिकोनातून देणारे शिक्षण शैक्षणिक धोरणामुळे शक्य होणार असल्याचे सोदाहरण विषद केले. सूत्रसंचालन व कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्या डॉ. लता मोरे यांनी केले.

शिक्षण मंडळाचे ध्येय श्लोक सुषमा फुलंब्रीकर, ध्येयवाक्य प्रा.रूपेश देवरे, संघटन गीत गीतांजली शिंदे, कल्याण मंत्र प्रा. आशिष सोनार, तांत्रिक सहाय्य प्रा.कैलास चौधरी यांनी तर आभार प्रा. संजय अहिरे यांनी मानले. या वेबिनारसाठी नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षण क्षेत्रातील अनेक शिक्षक, प्राध्यापक, कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते. सेमिनार यशस्वीतेसाठी भारतीय शिक्षण मंडळाच्या नंदुरबार जिल्हा कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.