शहाद्यातील प्रभाग क्रमांक तीन पूर्णपणे झाला सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 12:17 PM2020-06-03T12:17:00+5:302020-06-03T12:17:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील प्रभाग क्रमांक तीन मधील गरीब नवाज कॉलनीतील ४१ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला ...

Ward number three in Shahada was completely sealed | शहाद्यातील प्रभाग क्रमांक तीन पूर्णपणे झाला सील

शहाद्यातील प्रभाग क्रमांक तीन पूर्णपणे झाला सील

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील प्रभाग क्रमांक तीन मधील गरीब नवाज कॉलनीतील ४१ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे़ गत तीन दिवसात शहरात दोन रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे़ दरम्यान बाधिताच्या कुटुंबातील सहा जणांसह एक डॉक्टरला क्वारंटाईन करण्यात आले़
रात्री उशिरा क्वारंटाईन करण्यात आलेल्या सर्वांचे स्वॅब नमुने घेण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ़ चेतन गिरासे यांनी दिली आहे़ अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सोमवार रात्रीपासून प्रशासन सतर्क झाले होते़ संपूर्ण गरीब नवाज कॉलनी परिसर सील करण्यात आला होता़ पालिका आरोग्य विभागामार्फत निर्जंतुकीकरण करुन हा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित आहे़ येथील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने व व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत़
२८ मे रोजी गरीब नवाज कॉलनीतील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता़ त्यानंतर १ जून रोजी पुन्हा रजा मस्जिद परिसरातील ४१ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तीन दिवसात दोन रुग्ण शहादा शहरात आढळून आले आहेत़ दरम्यान कोरोनाबाधितावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आल्याची माहिती होती़ माहितीनंतर प्रशासनाने हे रुग्णालय सील केले असून तेथील कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे़

Web Title: Ward number three in Shahada was completely sealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.