शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: मानवी साखळीद्वारे दिला मतदानाचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा प्रशासनातर्फे मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत येथील जी.टी. पाटील महाविद्यालय येथे मतदार जागृती मानवी साखळीचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा प्रशासनातर्फे मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत येथील जी.टी. पाटील महाविद्यालय येथे मतदार जागृती मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. साडेसात हजार विद्याथ्र्यानी  मानवी साखळीद्वारे विधानसभा निवडणुकीचा लोगो तयार करीत मतदानाचा हक्क बजावण्याचा संदेश दिला. यावेळी निवडणूक निरीक्षक रंजन कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रकल्प संचालक अविनाश पांडा, वसुमती पंत, अपर जिल्हाधिकारी दत्तात्रय बोरुडे, दिलीप जगदाळे,  निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपजिल्हा निवडणूक  अधिकारी सुधीर खांदे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अविनाश सोनवणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ उपस्थित  होते.गुरुवारी सकाळपासून जी.टी. पाटील महाविद्यालयाचा परिसर विद्याथ्र्यानी फुलला होता. विद्याथ्र्यानी शिस्तीचे प्रदर्शन घडवीत मानवी साखळी तयार केली. मानवी साखळीच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्याला मतदानाच्या टक्केवारीत राज्यात प्रथम क्रमांकावर आणण्याचा संदेश देण्यात आला. विद्याथ्र्यानी यावेळी ‘वोट फॉर नंदुरबार’ अशा घोषणा दिल्या. उपक्रमासाठी परिश्रम घेणा:या क्रीडा शिक्षकांचा या वेळी प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. मतदान करण्याची व मतदानासाठी इतरांना प्रोत्साहित करण्याची संकल्प शपथ घेण्यात आली. मानवी साखळीत शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी,  शिक्षक व आशा सेविकांनी सहभाग घेतला.

महोत्सवाप्रमाणे मतदानात सहभाग घ्या -रंजन कुमार निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असून नागरिकांनी लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी उत्साहाने मतदानात सहभाग घ्यावा व इतरांना मतदानासाठी प्रेरित करावे, असे आवाहन रंजन कुमार यांनी या वेळी केले. ते म्हणाले, भारत निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी ‘स्वीप’ कार्यक्रम सुरू केला आहे. मतदाराचे शिक्षण व त्याला मतदानासाठी प्रोत्साहीत करणे या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमामुळे मतदानाचे महत्व मतदारांर्पयत पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.जिल्हाधिकारी डॉ.भारूड म्हणाले की, लोकशाहीच्या महोत्सवात सहभागी होत युवकांनी मतदानाचा हक्क बजवावा व इतर विद्याथ्र्यानी परिसरातील पाच कुटुंबांना मतदानासाठी प्रेरित करावे. शालेय विद्याथ्र्यानी आपल्या पालकांना मतदानाचे आवाहन करावे. सर्वानी एकत्रित प्रय} केल्यास लोकसभा निवडणूक मतदानाच्या टक्केवारीत दुस:या क्रमांकावर असलेला नंदुरबार जिल्हा विधानसभा निवडणुकीत प्रथम क्रमांकावर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.