नव्या स्ट्रेन्थचा विषाणूचा जिल्ह्यात शिरकाव नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:32 IST2021-02-20T05:32:29+5:302021-02-20T05:32:29+5:30

नंदुरबार : जिल्ह्यात दैनंदिन कोरोना बाधितांची संख्या ३० च्या आतच राहत आहे. शिवाय कोरोना विषाणूच्या दुसऱ्या स्ट्रेन्थचादेखील शिरकाव नाही. ...

The virus of new strength has not infiltrated the district | नव्या स्ट्रेन्थचा विषाणूचा जिल्ह्यात शिरकाव नाही

नव्या स्ट्रेन्थचा विषाणूचा जिल्ह्यात शिरकाव नाही

नंदुरबार : जिल्ह्यात दैनंदिन कोरोना बाधितांची संख्या ३० च्या आतच राहत आहे. शिवाय कोरोना विषाणूच्या दुसऱ्या स्ट्रेन्थचादेखील शिरकाव नाही. त्यामुळे जिल्हावासीयांनी घाबरून जाण्यासारखी स्थिती नाही. शिवाय जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेटदेखील १६ पर्यंत आहे तर मृत्युदर हा केवळ २.३७ इतका आहे. दुसरीकडे बरे होण्याचे प्रमाण देखील ९६.२ इतका आहे. राज्यात इतर भागात वाढत असलेल्या रुग्ण संख्येमुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून निर्बंध लागू केले आहेत. त्याचे पालन करणे आता जिल्हावासीयांच्या हातात आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा दुसरा विषाणूने शिरकाव केला असून तो सर्वात धोकेदायक असल्याचा मेसेस आणि व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. त्यातच गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाबाबीत काही निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे त्यात आधीच भर पडली. त्यामुळे लोकांमध्ये भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले. शुक्रवारी सर्वत्र याच विषयाची चर्चा होती. परंतु कोरोनाचा दुसऱ्या विषाणूबाबतचे वृत्त निराधार असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील काही स्वॅब यापूर्वीच पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचे रिपोर्ट निल आहेत. त्यामुळे याबाबतच्या चर्चा या निराधार आहेत.

जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून रुग्ण आढळण्याचे प्रमाणदेखील ३० च्या आतच राहिले आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

अर्थात राज्यातील इतर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण कमालीचे वाढले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यातदेखील कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये यासाठी प्रत्येकाने प्रशासनाने लावलेल्या निर्बंधांचे पालन केले पाहिजे. मास्क वापरून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, अशा ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहनदेखील करण्यात येत आहे.

Web Title: The virus of new strength has not infiltrated the district