शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
4
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
5
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
6
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
7
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
8
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
9
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
10
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
11
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
12
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
13
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
14
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
15
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
16
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
17
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
18
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
19
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
20
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्ण आढळल्याची व्हायरल पोस्ट खोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 12:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : एका न्यूज चॅनेलचा लोगो घेवून त्यात अक्कलकुव्यात कोरोनाचे तीन रुग्ण आढळले अशी पोस्ट व्हायरल ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : एका न्यूज चॅनेलचा लोगो घेवून त्यात अक्कलकुव्यात कोरोनाचे तीन रुग्ण आढळले अशी पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे. ती पोस्ट खोटी असून संबधीतांचा शोध घेतला जावून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रभारी तहसीलदार विजय कचवे यांनी माहिती दिली.अक्कलकुवा शहरात कोरोना साथीबाबत सामाजिक प्रसारमाध्यमांमध्ये अफवा पसरवली जात असून व्हायरल करण्यात आलेल्या फोटोमध्ये कोणतेही तथ्य नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोरोना या साथीबाबत अक्कलकुवा शहरासह तालुक्यामध्ये संपूर्णत: खबरदारी घेतली जात असून प्रशासन त्याबाबत सतर्क असल्याची माहिती प्रभारी तहसीलदार विजय कचवे यांनी दिली. सामाजिक माध्यमांमध्ये कोरोना आजाराविषयी अफवा पसरविणाऱ्यांवर तात्काळ कारवाई कारवाई केली जाईल सामाजिक प्रसारमाध्यमांमध्ये अक्कलकुवा शहरात अफवा पसरवणाºया अज्ञाता विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याच्या शोध घेतला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. कोणीही बेजबाबदारपणे याबाबत वक्तव्य केल्यास गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील असे पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी यावेळी कोरोना या साथी च्या आजारा विषयी कोणीही अफवा पसरवू नये तसेच या आजाराबाबत जागृत राहून गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे स्वत:हून आपण त्याबाबत अधिक काळजी घ्यावी असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी स्वप्नील वानखेडे यांनी यावेळी करून कोणीही अफवा पसरवू नये असेही सांगितले. गट विकास अधिकारी सी.के .माळी ,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ स्वप्निल मालखेडे व इतर अधिकारी उपस्थित होते.