रस्ता काम अपूर्णमुळे चिखलात फसली वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:32 IST2021-07-28T04:32:18+5:302021-07-28T04:32:18+5:30

प्रकाशा- प्रकाशा ते शहादा मार्गावर डामरखेडा दरम्यान रोडचे काम अपूर्ण आहे. त्याठिकाणी मातीचा भराव केलेला असून, पाऊस पडल्यावर ...

Vehicles stuck in the mud due to incomplete road works | रस्ता काम अपूर्णमुळे चिखलात फसली वाहने

रस्ता काम अपूर्णमुळे चिखलात फसली वाहने

प्रकाशा- प्रकाशा ते शहादा मार्गावर डामरखेडा दरम्यान रोडचे काम अपूर्ण आहे. त्याठिकाणी मातीचा भराव केलेला असून, पाऊस पडल्यावर त्या ठिकाणी चिखल होतो व चिखलामुळे वाहने फसत आहेत. मंगळवारीदेखील सकाळपासूनच वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

कोळदा ते शेंधवा या महामार्गाचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. प्रकाशा शहादा रस्त्यावर प्रकाशा ते डामरखेडा गावादरम्यान रोडचे काम अपूर्ण आहे. त्याठिकाणी मातीचा भराव केलेला आहे. पावसाचे पाणी पडल्यानंतर या ठिकाणी चिखल होतो. अवजड वाहनांचे टायर या चिखलामध्ये फसतात आणि त्यामुळे दुतर्फा रहदारी खोळंबते.

सोमवारी सकाळीदेखील मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू होता, त्यामुळे वाहन हळू निघत होती; मात्र साडेनऊ वाजता एक

ट्राॅॅला

मध्येच अडकल्यानंतर दुतर्फा वाहनांची रांगच लागली. एकही वाहन निघत नव्हते. त्यातच पाऊस सुरू होता.

पर्यायाने डांमरखेडा मार्गे धुरखेडा रस्त्याकडून प्रकाशाकडे वाहने काढली जात होती.

वाहतूक विस्कळीत झाल्याचे कळल्यावर प्रकाशा पोलीस दूर क्षेत्राचे पोलीस कॉन्स्टेबल विकास शिरसाठ, अजिद नागलोद, प्रकाश अहिरे यांनी एका बाजूची पूर्ण ट्राफिक थाबविली आणि दुसऱ्या बाजूची ट्राफिक काढली, त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. दीड ते दोन तासानंतर विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत होऊ शकली.

Web Title: Vehicles stuck in the mud due to incomplete road works