शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
5
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
6
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
7
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
8
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
9
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
10
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
11
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
12
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
13
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
14
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
15
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
16
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
17
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
18
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
19
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
20
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:07 IST

जयनगर, ता.शहादा येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच मीनाबाई सोनवणे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी अध्यक्षस्थानी उपसरपंच सुनील माळी ...

जयनगर, ता.शहादा येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच मीनाबाई सोनवणे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी अध्यक्षस्थानी उपसरपंच सुनील माळी होते. तर चक्रधर माध्यमिक विद्यालयात कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती ईश्वर राजाराम माळी, जिल्हा परिषद शाळेत शालेय शिक्षण समिती अध्यक्ष अरुणाबाई भिल यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी कोविड १९ च्या नियमांचे पालन करण्यात आले होते.

मूकबधिर निवासी विद्यालय, नंदुरबार

नंदुरबर तालुक्यातील दुधाळे येथील मूकबधिर निवासी विद्यालय व डी.एड. कॉलेज फॉर स्पेशल एज्युकेशनमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील इ.एन.टी. सर्जन डॉ.कपिल दुसेजा यांच्याहस्ते भारतमातेचे प्रतिमा पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून बी.डी.एस. डॉ.ऋचा कपिल दुसेजा, पोलीस कॉस्टेबल साहेबराव खांडेकर उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक सुनील चौधरी यांनी केले.

करजकुपे

नंदुरबार तालुक्यातील करजकुपे येथील जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी सरपंच भिला ठाकरे, उपसरपंच दशरथ पटेल, पंचायत समितीचे माजी सदस्य कांतीलाल ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य जगन ठाकरे, करूणा पटेल, शाळा समितीचे अध्यक्ष जयेश ठाकरे, उपाध्यक्ष सीताराम पाडवी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित पटेल, ग्रामसेविका मनीषा बडगुजर सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उदय ठाकरे, केंद्रप्रमुख सुरेश तावडे उपस्थित होते. यानंतर सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उदय ठाकरे यांचा ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. त्यांनी वडील बाबुलाल ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शाळेला हँडवॉश स्टॅन्ड, पाच लीटर सॅनिटायझर, तापमापक गन, ऑक्सिमीटर, २०० मास्क, प्लॅस्टिकच्या सहा खुर्च्या दिल्या. सूत्रसंचालन सुनील भदाणे यांनी केले. मुख्याध्यापिका शुभांगिनी गोसावी, रवींद्र साळुंखे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आदींनी संयोजन केले. यानंतर गावात क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या.

नॅशनल गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, नंदुरबार

नंदुरबार येथील नॅशनल गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये संस्थेचे अध्यक्ष अल्हाज इनामदार जकाउल्लह हसन उल्लाह साहेब यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी संस्थेचे पदाधिकारी शेख मो.हनीफ, खान लियाकत अली, अल्हाज अशरफ खान, अल्हाज जाबिर जनाब, अल्हाज अ.लतीफ मन्यार, प्राचार्या इनामदार साबीहा बानो, नगरपालिका शाळा क्रमांक पाच, १२ व १९ चे मुख्याध्यापक काझी मुदस्सीर, उत्तम गोपाल पावरा, सैय्यद मुजाहिद तसेच शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता सर्व नियमांचे पालन करण्यात आले.