शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

धडगाव तालुक्यात जलसाक्षरता सप्ताहानिमित्त विविध उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:29 IST

सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी जैवविविधता निरीक्षण, माहिती व बीज संकलन हे उपक्रम राबवण्यात आले. वृक्ष, वेली ,झुडपे, पाण्यातील प्राणी ...

सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी जैवविविधता निरीक्षण, माहिती व बीज संकलन हे उपक्रम राबवण्यात आले. वृक्ष, वेली ,झुडपे, पाण्यातील प्राणी यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यादरम्यान विद्यार्थ्यांनी चिंच, बोर, टेंभरू, दोडके, गिलके, विविध प्रकारचे भोपळे, सीताफळ, मालकांगणी, सागरगोटी, गुळवेल, पळस, वाल, बेहडा, लिंबू, साग, खिरणी यांच्या हजारो बियांचे संकलन केले.

सप्ताहादरम्यान जागतिक चिमणी दिवसानिमित्त प्राचार्य डाॅ. एच. एम. पाटील यांनी चिमण्यांचे पर्यावरणातील महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. सप्ताहात तीन महिन्यांपासून विद्यार्थी संकलित करत असलेल्या प्लॅस्टिक बाॅटल्सचा चिमण्यांसाठी अन्नदाणी आणि जलपात्र तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. प्रसंगी परिसरातील चिमण्यांचा अधिवास वाढण्यासाठी १०९ प्लॅस्टिक बाॅटल्सचा पुनर्वापर करण्यासाठी विद्यार्थ्यांना सोपवण्यात आल्या.

सप्ताहातील संध्यादर्शन कार्यक्रमात जलस्रोतांना भेट देणे, पक्षी निरीक्षण, आकाश निरीक्षण आदी उपक्रमात विद्यार्थी सहभागी झाले होते. दरम्यान, जागतिक वनदिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य डाॅ. पाटील यांनी पळसाच्या फुलांपासून होळीसाठी पर्यावरणपूरक नैसर्गिक रंग तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. या रंगामुळे त्वचेला, डोळ्यांना व पर्यावरणाला हानिकारक असलेले रासायनिक रंग वापरणे कमी होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

विद्यार्थ्यांनी संकलित केलेल्या बियांचे नर्सरीतल्या पिशव्यांमध्ये करुन जवळपास विविध प्रकारांच्या दोन हजार रोपांची सोय करण्यात आली.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी धनाजे येथील उपसरपंच चंद्रासिंग पावरा, शहादा येथील जायंटस फेडरेशनच्या उपाध्यक्ष संगीता पाटील, सामाजिक कार्यकर्ते अनिल पावरा, तलावडीचे आपसिंग पावरा,कालुसिंग पटले, राजेंद्र चावडा उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून धनाजे, मुगबारी, मांडवी येथील २ हजार ४०० नागरिकांची या सप्ताहातून जनजागृती करण्यात आली. उपक्रमासाठी भरत पावरा, ब्रिजलाल पटले, जितेंद्र पावरा, अशोक पावरा, सुनील परमार, दशा पावरा, प्रा.अनिल शिंदे, प्रा.डाॅ. हरिभाऊ पवार, पानसिंग राहसे, अजय पटले, नोमा पावरा, प्रकाश पावरा यांनी परिश्रम घेतले.