शंभर वर्षाच्या वृद्धाने केले पत्नीसह लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:28 IST2021-05-01T04:28:56+5:302021-05-01T04:28:56+5:30

म्हसावद येथे ग्रामीण रूग्णालयात दररोज लसीकरण सुरू आहे. ग्रामपंचायत म्हसावद मार्फत ४५ वर्षांवरील व्यक्तीसाठी लसीकरण शिबिराविषयी ध्वनिक्षेपक मार्फत जनजागृती ...

Vaccination with wife done by a hundred year old | शंभर वर्षाच्या वृद्धाने केले पत्नीसह लसीकरण

शंभर वर्षाच्या वृद्धाने केले पत्नीसह लसीकरण

म्हसावद येथे ग्रामीण रूग्णालयात दररोज लसीकरण सुरू आहे. ग्रामपंचायत म्हसावद मार्फत ४५ वर्षांवरील व्यक्तीसाठी लसीकरण शिबिराविषयी ध्वनिक्षेपक मार्फत जनजागृती केली. जनता कर्फ्यू , कोरोनाविषयक जनजागृती, सोडियम हायपोक्लोराइड फवारणी,कोरोना टेस्टिंगचे शिबिर आयोजित करून, कोरोना साथ रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवल्याने ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळत आहे. गुरूवारी आयोजित कोविड १९ लसीकरण शिबिरात दुपारपर्यंत साठच्या वर महिला पुरूषांनी लसीकरण केले. यात शंभर वर्षांचे वृद्ध जाधव मंगळू पाटील यांनी पंच्चाऐंशी वर्षांच्या आपल्या पत्नी काशिबाई पाटील यांचेसह चालत आले आणि लसीकरण करून घेतले. उपस्थित सर्वांनी आश्चर्यासह कौतुक केले. यावेळी जाधव पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन पाडळदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाॅ. चंद्रकांत सामुद्रे,म्हसावद ग्रामपंचायत सरपंच आक्काबाई ठाकरे, उपसरपंच चिंतामण लांडगे, ग्रामविकास अधिकारी भटेसिंग गिरासे, माजी उपसरपंच प्रकाश पाटील, केंद्रप्रमुख पराग चव्हाण यांनी सत्कार केला.दरम्यान कोरोना बाधित रूग्णांची संख्या घटली असून बाहेरचे चार तर गावातील एक असे पाच रूग्ण विलगीकरण कक्षात दाखल झालेले आहेत. लसीकरण शिबिर दर गुरूवारी होणार असून ग्रामस्थांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामविकास अधिकारी भटेसिंग गिरासे यांनी केले आहे. ग्रामीण रूग्णालयातील डाॅ. अल्लाऊद्दीन शेख, डाॅ. गोविंद शेल्टे,डाॅ. सागर पावरा,प्रशांत साळवे,वैशाली यादव,दामिनी भावसार,आरोग्य कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

Web Title: Vaccination with wife done by a hundred year old