पिंप्राणी येथे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:31 IST2021-05-21T04:31:06+5:302021-05-21T04:31:06+5:30

शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभ व आभारप्रदर्शन जि.प. शाळा पिंप्राणी व जुनी पिंप्राणीच्या ...

Vaccination at Pimprani | पिंप्राणी येथे लसीकरण

पिंप्राणी येथे लसीकरण

शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभ व आभारप्रदर्शन जि.प. शाळा पिंप्राणी व जुनी पिंप्राणीच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमास जि.प. अध्यक्षा ॲड. सीमा वळवी व जि.प. सदस्या रजनीताई नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिरास प्रारंभ झाला. पिंप्राणीचे सरपंच करणसिंग रावताळे, उपसरपंच उदेसिंग चौधरी, ग्रामसेविका संगीता नाईक, भाईदास बागले, शहादा तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉ. सुरेश नाईक, डॉ. जाधव ठाकरे, पं.स. सदस्य सत्येन वळवी, शिक्षण विस्तार अधिकारी सुनील तावडे, डी.टी. वळवी, पिंप्राणी गावात प्रथम लस घेणारे शिवाजी गेंद्रे, सखाराम मोते, ॲड. राजेंद्र ठाकरे, ओंकार पटले, दिवाण पावरा, डॉ. मणिलाल शेल्टे, डॉ. चंकी पराडके, पेंढारकर, परिचारिका, आशा कार्यकर्ती, येवले, पिंप्राणी जि.प. शाळेचे मुख्याध्यापक ए.आर. पानपाटील, जुनी पिंप्राणीचे मुख्याध्यापक पाटील, विष्णू पवार, मडकाणीचे सरपंच प्रल्हाद पवार, ग्रामसेवक तुषार कन्हैया, आमोदा येथील तारसिंग ठाकरे, संदीप वळवी, ग्रामपंचायतीचे रोजगारसेवक गणेश, शरद यांचे सहकार्य लाभले. जि.प. अध्यक्षा ॲड. सीमा वळवी व पदाधिकाऱ्यांनी रामपूर, फत्तेपूर व आमोदा येथील जिल्हा परिषद शाळांना भेट दिली व गावातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

Web Title: Vaccination at Pimprani