नवापूर तालुक्यातील साडेतीन लाख लोकसंख्येत केवळ १० हजार लोकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:33 IST2021-04-28T04:33:03+5:302021-04-28T04:33:03+5:30

नवापूर : नंदुरबार जिल्ह्यासह नवापूर तालुक्यात कोरोना लसीकरणासंदर्भात जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन, आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर जनजागृती व लसीकरण मोहीम ...

Vaccination of only 10,000 people out of a population of 3.5 lakhs in Navapur taluka | नवापूर तालुक्यातील साडेतीन लाख लोकसंख्येत केवळ १० हजार लोकांचे लसीकरण

नवापूर तालुक्यातील साडेतीन लाख लोकसंख्येत केवळ १० हजार लोकांचे लसीकरण

नवापूर : नंदुरबार जिल्ह्यासह नवापूर तालुक्यात कोरोना लसीकरणासंदर्भात जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन, आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर जनजागृती व लसीकरण मोहीम राबवत आहे; परंतु ग्रामीण भागातून लसीकरण करण्यासंदर्भात उदासीनता दिसून येत आहे.

नवापूर तालुक्यातील बोकळझर गावात लसीकरणासंदर्भात जनजागृती रथ तयार करून लसीकरणासंदर्भात आवाहन करण्यात येत आहे. शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक आरोग्य अधिकारी, नर्स, डॉक्टर होम टू होम लसीकरणाचे सर्वेक्षण व जनजागृती करीत आहेत. काही स्वयंसेवी संस्था गीत सादर करून आवाहन करीत आहे. गावातील सरपंच राहुल गावित, शिक्षक अनिल पाटील, सुनील नहिरे, प्रदीप अहिरे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. ग्रामीण भागात लसीकरणाबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, ही भीती दूर करणे गरजेचे आहे. नंदुरबार जिल्ह्यात साधारणत: वीस लाख लोकसंख्येत फ्रंटलाइन वर्कर, ६५ वर्षे ते ४५ वर्षातील साधारण १ लाख लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. नवापूर तालुक्यात एकूण ३ लाख ३९ हजार लोकसंख्या असून, पहिला डोस ७ हजार ४८८ तर दुसरा डोस २ हजार ५३३ लोकांनी घेतला आहे. लसीकरणाचे प्रमाण अत्यंत कमी आहे.

लसीकरण वाढण्यासाठी तालुक्यात जनजागृती मोहीम व होम टू होम सर्वेक्षण केले जात आहे. नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, दोन्ही लसी सुरक्षित आहेत. अफवांवर विश्वास ठेवू नका, अशी माहिती मंदार कुलकर्णी यांनी दिली आहे. लसीकरण वाढवण्यासाठी मोठे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

शहरी भागांमध्ये लसीकरणासाठी मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत; परंतु नंदुरबार जिल्ह्यात लसीकरणासाठी प्रशासनाला वारंवार आवाहन करावे लागत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. कोरोनाचे संक्रमण होऊ नये म्हणून लसीकरण तसेच शासनाने दिलेल्या त्रिसूत्री मंत्राचा वापर करणे गरजेचे आहे. तोंडाला मास्क, शारीरिक अंतर, हात स्वच्छ धुणे, नवापूर तालुक्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. काल २५३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले आहेत.

Web Title: Vaccination of only 10,000 people out of a population of 3.5 lakhs in Navapur taluka