शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

मोलगी येथे ४८० नागरिकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:31 IST

जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायत आणि युनिसेफ यांच्या संयुक्त प्रयत्नातून काठी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत या शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराच्या नियोजनासाठी ...

जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायत आणि युनिसेफ यांच्या संयुक्त प्रयत्नातून काठी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत या शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराच्या नियोजनासाठी सरपंच मनोज तडवी यांच्या उपस्थितीत शिक्षक, आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ती, युनिसेफ प्रतिनिधी यांची बैठक घेण्यात आली. मोलगी गावातील प्रत्येक पाड्यावर ध्वनिक्षेपकाद्वारे लसीकरणाबाबत माहिती देण्यात आली. शिक्षकांनी जनजागृतीचे काम उत्तमरीतीने केले.

युनिसेफ प्रतिनिधी, आशा कार्यकर्ती आणि शिक्षकांनी लसीकरणासाठी पात्र नागरिकांची यादी तयार केली. सुरुवातीला स्थानिक लोकप्रतिनिधींचे लसीकरण करून त्याच्याद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात आले. प्रत्येक पाड्याला भेट देण्यात येऊन नागरिकांच्या मनातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला. जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित केले. त्यामुळे शिबिराला मिळणारा प्रतिसाद वाढला.

नागरिकांनी स्वत: लसीकरण करून इतरांनाही लसीकरणासाठी प्रेरित करावे, तसेच कोरोना विषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन खासदार डॉ. हीना गावित यांनी यावेळी केले. तहसीलदार रामजी राठोड यांनी शिबिराच्या आयोजनाविषयी माहिती दिली आणि नागरिकांना लसीकरणाचे आवाहन केले.

कार्यक्रमास गटविकास अधिकारी नंदकिशोर सुर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल मालखेडे, डॉ. कुलदीप ठाकरे, युनिसेफ तालुका समन्वयक जितेंद्र वळवी, बिजगव्हाणचे सरपंच रोशन तडवी, जिल्हा नियोजन समिती सदस्या बबिता नाईक, जि. प.चे माजी सदस्य नीतेश वळवी, आदी उपस्थित होते.

शिबिरासाठी मंडप उभारण्यात आला होता. नागरिकांच्या नोंदणीसाठी विविध कक्षांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. दुरून येणाऱ्या नागरिकांसाठी बिस्किटे आणि दुपारी खिचडीची व्यवस्था करण्यात आली. आशा कार्यकर्ती, आरोग्य सेवक आणि युनिसेफ प्रतिनिधी नागरिकांना मार्गदर्शन करीत होते. शिबिराच्या ठिकाणी आरटीपीसीआर चाचणीचीही व्यवस्था करण्यात आली होती. आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविकांनी लसीकरणाचे काम पाहिले.

सुरुवातीला लसीकरणासाठी खूप विरोध होता. मात्र, प्रशासनातील सर्व यंत्रणा आणि युनिसेफ प्रतिनिधींनी जनजागृतीवर भर दिला. स्थानिक लोकप्रतिनिधींचे लसीकरण करून त्यांच्याद्वारे आवाहन करण्यात आले. मिळणारा प्रतिसाद सर्वांचा उत्साह वाढविणारा आहे. आरोग्य यंत्रणा आणि शिक्षक विशेष प्रयत्न करीत आहेत.

-जितेंद्र वळवी, युनिसेफ तालुका प्रतिनिधी