जमाना केंद्रात १३६ नागरिकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:33 IST2021-05-25T04:33:56+5:302021-05-25T04:33:56+5:30

जमाना येथे राजीव गांधी भवनात लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन जि.प.चे माजी सदस्य रवींद्र पाडवी यांच्या हस्ते ...

Vaccination of 136 citizens at Jamana Kendra | जमाना केंद्रात १३६ नागरिकांचे लसीकरण

जमाना केंद्रात १३६ नागरिकांचे लसीकरण

जमाना येथे राजीव गांधी भवनात लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन जि.प.चे माजी सदस्य रवींद्र पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी गटविकास अधिकारी नंदकुमार सूर्यवंशी, केंद्रप्रमुख आर.के. बिऱ्हाडे, ग्रामसेवक विजय सैंदाणे, डॉ.लालसिंग हुरेज, केंद्र समन्वयक जगदीश पाटील, राकेश आव्हाड आदी उपस्थित होते. या वेळी नागरिकांना लसीकरणाची माहिती स्थानिक बोलीभाषेतून शिक्षक वसंत पाडवी यांनी दिली. केंद्रातील शिक्षकांनी गाव,पाड्यात, वस्तीवर जाऊन लोकांमध्ये जागृती करून लसीकरणासाठी आणले. ग्रामपंचायतीमार्फत लस घेणाऱ्या व्यक्तीस बिस्किट, सॅनिटायझर व मास्क वाटप करण्यात आले. जमाना केंद्रात हे दुसरे शिबिर झाले. पहिल्या शिबिरात ४५ वर्षांवरील १०६ तर आता १३६ असे २४२ लोकांचे लसीकरण करून घेण्यात आले. आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ती, शिक्षक हरिश्चंद्र अहिरराव, दीपक तडवी, मंगलसिंग वळवी, तुळशीराम वसावे, दीपक पाडवी, राजू कोकणी, तुळशीराम वसावे आदींनी शिबिरासाठी परिश्रम घेतले.

Web Title: Vaccination of 136 citizens at Jamana Kendra