शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

बंदी असलेल्या कंपनीच्या औषधींचा जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांमध्ये वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 12:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा दौ:यावर आलेल्या आदिवासी आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडीत यांनी जिल्ह्यातील अंगणवाडय़ा, आश्रमशाळा, प्राथमिक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा दौ:यावर आलेल्या आदिवासी आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडीत यांनी जिल्ह्यातील अंगणवाडय़ा, आश्रमशाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात भेटी देत सोयी सुविधांचा आढावा घेतला़ भेटीदरम्यान काकर्दा ता़ धडगाव येथील आरोग्य केंद्रात शासनाने बंदी घातलेल्या कंपनीच्या औषधांचा साठा दिसून आला़  सोमवारी सकाळी विवेक पंडीत यांनी पातोंडा ता़ नंदुरबार येथील अंगणवाडी केंद्रात भेट दिली़ याठिकाणी एकही तीव्र कुपोषित बालक नसल्याचे समितीचे अध्यक्ष पंडीत यांना सांगण्यात आले होत़े यावेळी त्यांनी रजिस्टरची तपासणी केली असता, तशी नोंदही आढळून आली़  परंतू  रजिस्टरमधील  नोंदी  आणि मुलांची  अवस्था  पाहून त्यांनी  एका बालकाची  तपासणी केली़  यात बालकाचे वजन  कमी आढळून ते तीव्र कुपोषित असल्याचे सिद्ध झाल़े रजिस्टरमध्ये त्याची नोंद कुपोषित बालक करण्यात आली होती. व त्याला  कुपोषित बालकाची ट्रीटमेंट  दिली गेली़ तसेच अंगणवाडीतील मुलांची पटसंख्या व त्यांना दिला जाणारा आहार व इतर आकडेवारी जशीच्या तशी कॉपी पेस्ट केलेली आढळली.  यावेळी विवेक पंडित यांनी  बालकविकास प्रकल्प अधिकारी यांना अंगणवाडीचा पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. समितीच्या दौ:यात शहरालगत  पहिल्याच अंगणवाडीच्या पाहणीत समोर आलेली परिस्थिती बघता  ग्रामीण भागात काय परिस्थिती असेल असे सांगत आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडीत यांनी चिंता व्यक्त केली़ दरम्यान विवेक पंडीत यांनी रामपूर ता़ शहादा येथील आश्रमशाळेत भेट दिली़ यानंतर त्यांनी काकर्दा ता़ धडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट दिली होती़ भेटीदरम्यान हिंदुस्थान लॅॅबोरेटरी नामक कंपनीचा प्रमाणपेक्षा अधिक औषधसाठा त्यांना दिसून आला़ संबधित कंपनी ही दुस:याकडून औषधी बनवून पुरवठा करत असल्याने शासनाने त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आह़े असे असतानाही येथे कंपनीचा स्टॉक आढळून आल्याने आरोग्य अधिकारी व संबधित वैद्यकीय अधिकारी यांनी मंगळवारी होणा:या बैठकीवेळी कागदपत्रांसह माहिती सादर करण्याच्या  सूचना त्यांनी भेटीदरम्यान केल्या़

काकर्दा येथील आरोग्य केंद्रातील रिक्त पदांच्या समस्येसह धडगाव ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकाम आणि त्याच्या दर्जावर समिती अध्यक्ष पंडीत यांनी बोट ठेवल़े ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी निवासस्थानांचे बांधकाम मार्च 2015 मध्ये पूर्ण करावयाचे असतानाही त्यात दिरंगाई झाल्याने स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश त्यांनी दिल़े धडगाव येथील महिला रुग्णालय, शासकीय आयटीआय येथील कामावर त्यांनी नाराजी व्यक्त केली़ दरम्यान भांगरापाणी आश्रमशाळेच्या बांधकामाचा दर्जा निकृष्ट असल्याने या कामाबाबत मंगळवारच्या बैठकीत उत्तर सादर करण्याचे आदेश प्रकल्प कार्यालयाला दिल़े