रेल्वेतून पडून अनोळखी महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: May 16, 2017 17:51 IST2017-05-16T17:51:26+5:302017-05-16T17:51:26+5:30

रेल्वेतून पडून या महिलेचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे

Unborn woman dies due to falling from a train | रेल्वेतून पडून अनोळखी महिलेचा मृत्यू

रेल्वेतून पडून अनोळखी महिलेचा मृत्यू

ऑनलाइन लोकमत

नंदुरबार, दि. 16 - जिल्ह्यातील विविध भागात वेगवेगळ्या घटनेत तिघांचा मृत्यू झाला़  एका महिलेचा रूळावर मृतदेह आढळून आला असून रेल्वेतून पडून या महिलेचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. दुस:या एका घटनेत तरुणाने गळफास घेतला तर एका महिलेचा विजेच्या धक्क्याने  मृत्यू झाला़ 
अज्ञात महिलेचा मृतदेह रूळावर 
नंदुरबार तालुक्यातील चौपाळे ते तिसी रेल्वेस्थानकादरम्यान रेल्वे रूळावर अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आह़े  ही महिला रेल्वेतून पडून मयत झाल्याचा अंदाज आह़े
गळफास घेत आत्महत्या
कान्हाळा ता़ नवापूर येथील कृष्णा विक्रम गावीत (24) या युवकाने सोमवारी सकाळी 10़30 वाजेच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली़ मयत कृष्णा गावीत याने वेडाच्याभरात हे कृत्य केल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आह़े  
 अक्कलकुवा तालुक्यातील घंटाणी येथील संजबाई मगन तडवी (35) ही महिला धुतलेले कपडे सुकवण्यासाठी घराबाहेरील वाडय़ात गेली असता, विजेचा धक्का लागून मृत्यू झाला़ 

Web Title: Unborn woman dies due to falling from a train