शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

चांदसैली घाटात रस्ता खचण्याचे प्रकार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 12:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा ते धडगाव दरम्यान असणाऱ्या चांदसैली घाटात दरवर्षीप्रमाणे रस्ता खचण्याच्या सत्राला सुरूवात झाली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : तळोदा ते धडगाव दरम्यान असणाऱ्या चांदसैली घाटात दरवर्षीप्रमाणे रस्ता खचण्याच्या सत्राला सुरूवात झाली आहे. त्यामुळे रस्ता दुरूस्तीसाठी केला जाणार खर्च निरर्थक ठरत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, या घाटात अनेक ठिकाणी संरक्षण कठड्यांचीदेखील दुरवस्था झाली असल्याने प्रवासात प्रवाशांचा जीव टांगणीला असल्याचे दिसून येते.
चांदसैली घाट हा सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात धोकेदायक व प्रेक्षणीय घाट म्हणून प्रसिध्द आहे. दरवर्षी पावसाळ्यात या घाटात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या निर्माण होत असते. पावसाळ्यात घाटातील रस्ता ठिकठिकाणी खतच असल्याने बºयाचदा घाट मार्गातील वाहतूक बंद होत असते. पावसाळ्यात अनेक ठिकाणी रस्त्याला ठिकठिकाणी मोठे भगदाड पडत असल्याचा अनुभव आहे. खचणाºया रस्त्याच्या दुरूस्तीसाठी व रस्ता खचू नये यासाठी भराव तसेच संरक्षक भिंत बांधण्यासाठी दरवर्षी लाखों रूपयांची कामे संबंधित विभागामार्फत केली जातात. मात्र दरवर्षी पहिल्याच पावसात घाटातील रस्ता नेहमी प्रमाणे खचत असल्याने कामाची गुणवत्ता व उपयोगिता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
नागमोडी वळणे, खोल दरी, अरूंद रस्ता यामुळे चांदसैली घाटात वाहन चालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातच रस्त्यावर दरळी कोसळलेल्या दरळी, तीव्र चढाव व उतार, खचलेला रस्ता, रस्तावर माती व चिखल, संरक्षक कठड्यांचा अभाव व दुरावस्था यामुळे घाटातील वाट अधिक बिकट बनली आहे. या सर्व प्रकारामुळे वाहनधारकांना व प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असतो. तारेवरची कसरत करीत वाहनधारकांना घटमार्गात वाहने मार्गस्थ करावी लागत असतात.
घाट मार्गात अनेक अत्यावश्यक ठिकाणी रस्त्याच्या कडेला संरक्षण काठड्यांचा अभाव असल्याचे दिसून येते. घाटात अनेक ठिकणी संरक्षक कठड्यांची अत्यावश्यक गरज असून, त्याकडे नेहमी दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्या अनेक कठड्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे रस्ताच्याकडेला असणाºया खोल दरीत एखादे वाहन दुर्देवाने अनियंत्रित होऊन किंवा अनावधानाने वाहन गेल्यास ते थेट ४०० ते ५०० फूट खोल दरीत कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळे संपूर्ण घाटमार्गात संरक्षक कठडे बसविण्याची गरज आहे.
चांदसैली घाटातील रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तळोदा उपविभागात तर काही भाग हा नंदुरबार उपविभागाच्या हद्दीत येतो. मागील काही वर्षापासून घाटात रस्ता खचणे व त्याच्या दुरूस्तीसाठी निधी खर्च करण्याचे चक्र सुरू आहे. लाखों रूपये खर्च करून घाटातील रस्त्याची दैनावस्था जैसे थेच राहत असल्याने वाहनधारकांमध्ये तीव्र नाराजी आहे.