शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

महालक्ष्मी नगरमध्ये सुविधांचा वाणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील सर्व्हे नंबर २८ मध्ये पालिकेने सर्वसाधारण सभेत मंजूर केलेल्या रस्ते, गटारी आणि ओपन ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील सर्व्हे नंबर २८ मध्ये पालिकेने सर्वसाधारण सभेत मंजूर केलेल्या रस्ते, गटारी आणि ओपन प्लेसच्या विकासाची कामे रखडल्याने या भागात असुविधा निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पालिकेने त्वरीत सुविधात्मक कामे सुरू करावीत अशी मागणी रहिवाशांनी पालिकेकडे केली आहे.यासंदर्भात पालिका मुख्याधिकारी राहुल वाघ यांना देण्यात आलेल्या निवेदनाचा आशय असा, महालक्ष्मी नगर सर्व्हे नं. २८ मधील नागरिक या भागात गेल्या २० वर्षांपासून रहिवास करीत आहेत. या भागात रस्ते, गटारींसह विविध सविधा उपलब्ध नसल्याने गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.या भागात रस्ते, गटारी व ओपन प्लेसचा विकास व्हावा यासाठी पालिका दरबारी तसेच संबंधीत लोकप्रतिनिधींकडे तगादा लावूनही या भागाकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी या भागात असुविधांचा महापूर वाहत आहे. रस्ते नसल्याने दळणवळणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. पावसाळ्यात घरातून बाहेर पडणे मुश्कील होते. त्यातच सांडपाण्याची सोय नसल्याने ठिकठिकाणी घाण पाण्याचे डबके साचले आहेत. तसेच रस्त्यावर सांडपाणी येवून अशा पाण्यावर डास मच्छरांची उत्पत्ती झाली आहे. त्यामुळे साथीच्या आजारांना येथील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. शेजारी प्रभाग क्रमांक चारमध्ये विकासात्मक कामे होत आताना या भागाकडे दुर्लक्ष केले जात आहे . असा दुजाभाव का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.शहादा पालिकेने शहरातील सर्वच ओपन प्लेस विकसित करण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने ओपन प्लेसचा विकासही केला जात आहे. परंतु या भागातील सर्व्हे नं. २८ मधील ओपन प्लेस विकासाची प्रतिक्षा करीत आहे. या ओपनप्लेस विकसीत करावा या संदर्भातील विषय सर्वसाधारण सभेत मंजूर झाला असतांना हा ओपन प्लेस का विकसीत केला जात नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. ओपन प्लेस विकसीत न झाल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वराहांचा वावर वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.त्यामुळे प्रशासनाने या भागाकडे जातीने लक्ष देवून परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवून सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अन्यथा मुलभूत सुविधांसाठी वेळोवेळी पालिकेविरूद्ध येथील नागरिकांना आंदोलन छेडावे लागेल व होणाऱ्या परिणामास पालिका प्रशासन जबाबदार राहिल आसा ईशारा निवेदनामार्फत देण्यात आला आहे. दरम्यान नगराध्यक्ष मोतीलाल पाटील व पालिकेचे गटनेते प्रा.मकरंद पाटील यांनाही नागरिकांनी निवेदन दिले.निवेदनावर दीपक चौधरी, वसंत बागले, दिनेश बाशिंगे, अनिल वाणी, जितेंद्र मोरे, कन्हैया पाटील, प्रकाश भोई, कुंदन चौधरी, नरेंद्र दीक्षित, महेंद्र बडगुजर, मनोज चौधरी, योगेश सावंत, सुनील आहिरे, नाना बिºहाडे, सुरेंद्र ढोडरे, प्रविण भावसार आदींच्या स्वाक्षºया आहेत.