शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी चोरीतील टोळी उघड, म्होरक्यास एलसीबीने केले जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:31 IST

नंदुरबार : शहादा, नंदुरबार तालुक्यासह धुळे जिल्ह्यातून दुचाकी चोरणारा चोरट्यास एलसीबीने मध्य प्रदेशातील मलफा गावातून अटक केली. त्याने १२ ...

नंदुरबार : शहादा, नंदुरबार तालुक्यासह धुळे जिल्ह्यातून दुचाकी चोरणारा चोरट्यास एलसीबीने मध्य प्रदेशातील मलफा गावातून अटक केली. त्याने १२ दुचाकी चोरल्याचे कबूल केले आहे. त्याच्यासोबत अल्पवयीन तीन चोरटे देखील सहभागी असल्याचे त्याने सांगितले.

मनोज दत्तू चव्हाण, रा.मलफा, ता.पानसेमल असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. नंदुरबार व शहादा तालुक्यातून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्यामुळे पोलिसांच्या तपासाविषयी नाराजी व्यक्त केली जात होती. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी एलसीबीला दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना केल्या होत्या. एलसीबीचे निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी याबाबत लक्ष केंद्रित करून पथकाला सूचना दिल्या.

एका घटनेतील चोरटा हा मध्य प्रदेशातील मलफा, ता.पानसेमल येथील असल्याची पक्की खबर राजपूत यांना मिळाल्याने त्यांनी पथकाला त्याबाबत कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने मलफा गावात पाळत ठेवली. चव्हाण याच्या हालचालींवर लक्ष ठेवले. सावज टप्प्यात येताच त्याला जेरबंद केले. त्याने कोळदा, ता.नंदुरबार येथील दुचाकी चोरल्याचे मान्य केले. पुन्हा त्याला विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने शहादा येथून तीन, सारंगखेडा येथून दोन, नंदुरबार उपनगर हद्दीतून एक तसेच धुळे जिल्ह्यातील सोनगीर व दोंडाईचा येथून प्रत्येकी एक तर इतर तीन अशा एकूण १२ दुचाकी लंपास केल्याचे सांगितले.

त्याच्यासोबत तीन अल्पवयीन साथीदार असल्याचेही त्याने सांगितल्याने त्यांचाही शोध सुरू आहे. चोरी केेलेल्या दुचाकी त्याने काढून दिल्याने त्या जप्त करण्यात आल्या आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक विजयसिंग राजपूत, हवालदार सजन वाघ, प्रमोद सोनवणे, पोलीस नाईक विकास अजगे, विजय धिवरे, किरण पावरा, सतीश घुले यांनी केली.